घुग्घूस : कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन शासनाने ३० मेपर्यंत कडक लाॅकडाऊन घोषित केले आहे. त्यात अत्यावश्यक सेवा व किराणा, भाजीपाला दुकान सकाळी ११ लाच बंद करण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे भाजी मंडईतील व्यापारी आर्थिक संकटात आले आहेत.
दुसरीकडे चारचाकीवर भाजीपाला विकणाऱ्या गाड्या दिवसभर तर सोडाच रात्री ९ वाजेपर्यंत मास्कचा वापर न करता ओरडू ओरडू बिनधास्त व्यवसाय करीत आहे. त्यामुळे बाजारात बसून व्यवसाय करून पोट भरणाऱ्या लोकांचे जगणे कठीण झाले आहे. या भाजीपाला विकणाऱ्यामध्ये अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. त्यांच्याकडे पासिंंग केलेले तराजू काटे नसल्याचे आढळून येते. या प्रकारे रात्रीपर्यंत रस्त्यावरून भाजीपाला विकी करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आहे.