लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मार्च ते मे या काळात ग्रामीण भागात घराचे तसेच शासकीय व निमशासकीय इमारतींचे मोठ्या प्रमाणात बांधकाम केले जाते. त्या अनुषंगाने संबंधितांनी जुनी घरे व इमारती जमीनदोस्त करून नवीन बांधकामाला सुरूवात केली. त्यातच कोरोनचा संगर्स रोखण्यासाठी शासनाने संचारबंदीसोबत लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे बांधकाम पूर्णपणे थांबले. दुसरीकडे बांधकाम कामगार काही काळासाठी बेरोजगार झाल्याने त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिवाय बांधकाम साहित्य पुरवठादारांनाही मोठा फटका बसला आहे.ज्यांना नवीन घराचे बांधकाम करावयाचे होते, त्यांनी जुनी घरे जमीनदोस्त करून तर काहींनी नवीन भुखंडावर घराच्या बांधकामाला सुरूवात केली. त्यासाठी काहींनी बँकाकडून गृहकर्ज घेतले तर काहींनी शासकीय योजनांचा लाभ घेतला. यावर्षी पावसाळा चांगला झाल्याने घराच्या बांधकामाचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत थोडे अधिक आहे. या काळात काही घराचे केवळ पायव्यापर्यंत तर काही घराचे भिंतीपर्यंत बांधकाम पोहोचले. काहींनी तर नुकतीच सुरूवात केली. चंद्रपूर शहर व जिल्ह्यामध्ये अनेकांनी गुढीपाडव्याला बांधकाम शुभारंभ करण्याच्या उद्देशाने फेबु्रवारी व मार्चमध्ये जुनी घरे पाडली. त्याआधीच लॉकडाऊन घोषित झाल्याने त्यांची मोठी पंचाईत झाली आहे. मनपा, नगर परिषद, ग्रामपंचातच्या हद्दीतील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळत असल्याने दोन वर्षात घराच्या बांधकामात वाढ झाल्याची माहिती कंत्राटदारांनी दिली. त्यामुळे कंत्राटदारांसह कामगारांना काम मिळाले असून साहित्य पुरवठादारांच्या उत्पन्नात वाढ झाली. मात्र, लॉकडाऊनमुळे या सर्वाला ब्रेक लागले, असेही कंत्राटदारांसह पुरवठादार व कामगारांनी सांगितले.अनेकांनी जानेवारीमध्येच जुने घरे पाडून नवीन बांधकामाला सुरूवात केली. लॉकडाऊ नमुळे बांधकाम बंद करावे लागले. अशी माहिती ‘लोकमतला’ दिली. नवीन बांधकाम करावयाचे असल्याने काहींनी जुनी घर पाडून किरायचे घर घेऊन राहण्याची तात्पूरती व्यवस्था केली. लॉकडाऊन संपेल कधी आधी कमाला सुरूवात होऊन घरांचे बांधकाम पूर्णत्वास जाणार कधी, तोपर्यंत किरायाच्या घरांमध्ये राहायचे काय, अशी चिंताही त्यांना भेडसावत आहे. काहींनी बांधकाम साहित्य खरेदी केली असून, कामाला गावंडी व कामगार मिळत नसल्याचे सांगितले. ही कामे नेमकी कधी सुरू होणार, याची उत्तर सध्या तरी कुणाकडे नाही.आर्थिक संकटलॉकडाऊ नमुळे सर्व कामे बंद झाल्याने जुने घर पाडणे, दगड, मातीच्या ठिगाऱ्याची विल्हेवाट लावून जागा मोकळी करणे, पायवा, कॉलम व शौचालयासाठी खोदकाम करणे, मुरूम रेती, विटा गिट्टी, सळाखी यांची वाहतूक करणे, सेंट्रिग बांधणे, रंगकाम करणे नळ व इलेक्ट्रिक फिटींग करणे, खिडक्यांच्या जाळ्या व ग्रील तयार करणे, लाकडाची कामे आदी कामे प्रभावित झाल्याने ती कामे करणाऱ्यांसह वाहतूकदार व विक्रेत्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.काम असूनही कामगार अडचणीतबांधकाम कामगारांनी अनेक कामे घेतली. मात्र लॉकडाऊन असल्यामुळे किमान २० दिवसांपासून काम नाही. त्यामुळे त्यांना मजुरीही नाही. घरातील धान्य व जीवनाश्यक वस्तू संपण्याच्या मार्गावर आहेत. त्या नव्याने खरेदी करण्यासाठी पैसा आणायचा कुठून, असा प्रश्न कामागरांना भेडसावत आहे.
बांधकाम कामागारांवर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 5:00 AM
ज्यांना नवीन घराचे बांधकाम करावयाचे होते, त्यांनी जुनी घरे जमीनदोस्त करून तर काहींनी नवीन भुखंडावर घराच्या बांधकामाला सुरूवात केली. त्यासाठी काहींनी बँकाकडून गृहकर्ज घेतले तर काहींनी शासकीय योजनांचा लाभ घेतला. यावर्षी पावसाळा चांगला झाल्याने घराच्या बांधकामाचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत थोडे अधिक आहे.
ठळक मुद्देघरांचे बांधकाम रखडले : पुढील वर्षाचे नियोजन बिघडले