शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
3
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
4
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
6
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
7
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
8
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
9
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
10
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

'मला गर्लफ्रेण्ड मिळत नाहीये.. तुम्ही पुढाकार घ्या'.. तरुणाने पत्र लिहून आमदारांसमोर व्यक्त केली खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 7:11 PM

Chandrapur News लाख लाख प्रयत्न करूनही मुलींनी भाव काही दिला नाही, यामुळे खचलेल्या एका तरुणाने थेट आमदारांनाच पत्र लिहिले. 'गर्लफ्रेण्ड मिळत नाही... हा माझ्यावर घोर अन्याय होत असून आता तुम्हीच पुढाकार घ्या', अशी विनंती थेट पत्रातून त्याने केली आहे.

ठळक मुद्देम्हणे तत्काळ उपाययोजना करासोशल मीडियात पत्र होतेय व्हायरल

नीलेश झाडे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कुणाचा जीव कुणावर कधी जडेल, याचा नेम नाही. प्रेमाच्या बाबतीत काहींचे नशीब फारच चमकलेले असते, तर दुसरीकडे काही जण शोध मोहिमेतच गुंतलेले दिसतात. लाख लाख प्रयत्न करूनही मुलींनी भाव काही दिला नाही, यामुळे खचलेल्या एका तरुणाने थेट आमदारांनाच पत्र लिहिले. 'गर्लफ्रेण्ड मिळत नाही... हा माझ्यावर घोर अन्याय होत असून आता तुम्हीच पुढाकार घ्या', अशी विनंती थेट पत्रातून त्याने केली आहे. हा तरुण राजुरा विधानसभा क्षेत्रातील आहे. हे पत्र समाजमाध्यमात भलतेच व्हायरल होत असून हशा पिकवत आहे. (I can't find a girlfriend .. You take the initiative .. The young man wrote a letter and expressed his grief in front of the MLAs)

'प्रेम म्हणजे प्रेम असते, तुमचे आमचे सेम असते,' ही गाजलेली कविता. मात्र प्रत्येक वेळी सेम टू सेम असतेच असे नाही. आता हेच बघा, राजुरा विधानसभा क्षेत्रातील भूषण नावाच्या तरुणाने प्रयत्नांची पराकाष्टा केली. मात्र त्याची प्रेयसी होईल, अशी कुणी मिळाली नाही. आपल्या सर्व मित्रांना प्रेयसी आहे, मात्र मलाच का नाही? हे दु:ख त्याला छळू लागले. अखेर त्याने थेट राजुरा विधानसभा क्षेत्रातील आमदारांनाच पत्र लिहिले व मला तरुणी का पटत नाही, असा सवाल त्यांना केला. नुसता सवालच केला नाही, तर यासाठी काही तरी उपाययोजना अंमलात आणण्याचा प्रयत्न करावा, अशी विनंतीही केली. हे पत्र समाजमाध्यमावर व्हायरल झाले असून बऱ्याच जणांसाठी तर हा करमणुकीचा व विनोदाचा विषय बनला आहे.

टॅग्स :Socialसामाजिक