लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गेल्या महिन्यापासून तापमानाने उचांक गाढला आहे. अंगाची लाहीलाही होणाऱ्या उष्णतेपासून बचावासाठी नागरिक शीतपेयांना पसंती देत आहेत. असे असले तरी पिण्याच्या पाण्यासाठी सर्वत्र थंड जार उपलब्ध होत असल्यामुळे नागरिक त्यालाच पसंती देत आहे. यामुळे बर्फ व्यवसाय काहीसा अडचणीत आला आहे.लग्न, दूधविक्रेते, रसवंतीगृह, शीतपेयांची दुकाने आदी व्यावसायिकांकडून उन्हाळ्यामध्ये बर्फाला मागणी असते, चंद्रपूर शहरामध्ये काही प्रमाणात आईस फॅक्टरी आहे. एका आईस फॅक्टरीमध्ये १० ते २० मजूर काम करतात. एप्रिल, मे आणि जून या तीनच महिन्यात बर्फाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यानंतर मात्र हा धंदा मंदावतो. यावर्षी असलेल्या दुष्काळामुळे काही प्रमाणात व्यवसायावर परिणाम पडला आहे.उन्हाळ्यातील तीन महिने वगळता इतर नऊ महिने ना नफा न तोटा या तत्वावरच बर्फाचा व्यवसाय करावा लागतो. मागील दोन वर्षांपासून सर्वत्र थंड जार उपलब्ध होत असल्यामुळे नागरिक त्यालाच पसंती देत असून, हा व्यवसाय दिवसेंदिवस अडचणीत येत आहे. केवळ काही व्यावसायिकांच्या भरवश्यावरच हा व्यवसाय चालत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.४८ तासात होते एक लादी तयारबर्फाची एक लादी तयार होण्यासाठी ४८ तासांचा वेळ लागतो. दिवसभरात एका आईस फॅक्टरीतून ४० ते ५० लाद्या तयार होतात. लादी तयार करण्यामागे मोठी मेहनत असली तरी ३०० ते ३५० रुपये दराने विक्री कली जाते. व्यवसायात स्पर्धा असल्याने भावात चढउतार होत असतात.आधुनिक साधनांमुळे बर्फाला मागणी घटलीप्रत्येकाच्या घरी फ्रीज तसेच व्यावसायिकांकडे मोठा फ्रीज उपलब्ध झाल्यामुळे बर्फाला मागणी घटली आहे. ग्रामीण भागातही सिंगल फेज लाईटवर चालणारे डी फ्रीज लाईटवर चालणारे फ्रीज आल्यामुळे बर्फाची मागणी घटली. दूध विक्रेते, लग्न समारंभ, रसवंती चालकांकडूनच मागणी होते. इतर महिन्यात ना नफा ना तोटा तत्वावर व्यवसाय सुरु ठेवावा लागतो.केवळ उन्हाळ्यात मागणी वाढतेएप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत तापमानात वाढ झालेली असते. लग्नाचे मुहूर्तही मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे गार पाण्याची मागणी असल्याने लोक बर्फाची लादी घेऊन पाण्याच्या साठ्यात सोडतात.त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात बर्फाच्या लाद्यांना मागणीत वाढ होत असल्याचे आईस फॅक्टरी चालकांचे म्हणणे आहे.
बर्फ बनविण्याचा व्यवसाय आला संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 10:34 PM
गेल्या महिन्यापासून तापमानाने उचांक गाढला आहे. अंगाची लाहीलाही होणाऱ्या उष्णतेपासून बचावासाठी नागरिक शीतपेयांना पसंती देत आहेत. असे असले तरी पिण्याच्या पाण्यासाठी सर्वत्र थंड जार उपलब्ध होत असल्यामुळे नागरिक त्यालाच पसंती देत आहे. यामुळे बर्फ व्यवसाय काहीसा अडचणीत आला आहे.
ठळक मुद्देअनेकांना रोजगार : थंड पाणी घरपोच मिळत असल्याने व्यवसाय घटला