आॅनलाईन लोकमतमूल : आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीने माणसातील चांगूलपणाचे दर्शन घडविले. त्यांच्या आवाहानाला तत्कालिीा भारतीय समाजाने भूमिहीनांसाठी जमिनी दान देऊन संपूर्ण जगाला औदार्य दाखवून दिले. त्यामुळे भूमिहिन शेतकºयांना भूदान यज्ञ मंडळाकडून देण्यात येणारी जमीन ही केवळ एका जमिनीचा तुकडा नसून ते आचार्य विनोबांचेच विचार आहेत. हा विचार शोषितांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय सर्वसेवा संघाचे अध्यक्ष महादेवभाई विद्रोही यांनी केले. भूदान यज्ञ मंडळाच्या वतीने भूमिहीन शेतकºयांना जमिनीचे पट्टे वितरण करताना ते ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.स्थानिक भाग्यरेखा सभागृहात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठाणचे अध्यक्ष जयवंत मठकर, मूल नगर परिषदच्या अध्यक्ष रत्नमाला भोयर, पंचायत समितीचे उपसभापती चंदू मारगोनवार, नगर परिषदचे उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, प्राचार्य आपटे, भूदान यज्ञ मंडळाचे सदस्य अविनाश काकडे, भाजपाचे शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर, नगर परिषद सदस्य प्रशांत समर्थ, वंदना वाकडे, आशा गुप्ता, महेंद्र करकाडे, संगीता वाळके आदी उपस्थित होते.महादेवभाई विद्रोही म्हणाले, देशातील भूमिहीनांना त्यांच्या कष्टाची भाकरी मिळवून देण्यासाठी आचार्य विनोबा भावे यांनी भूदानासाठी चळवळ उभी केली. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील चळवळीनंतरची ही सर्वात मोठी चळवळ आहे, असेही त्यांनी नमूद केले. भूदानात आलेल्या जमिनी भूमिहीन शेतकºयांना देण्यासाठी घेण्यात आल्या होत्या. हा कार्यक्रम तब्बल पन्नास वर्र्षांपूर्वीच्या कार्यक्रमाची आठवण करुन देणारा आहे, असे मत सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठाणच मठकर यांनी व्यक्त केले. नगराध्यक्ष भोयर, प्राचार्य आमटे यांनीही मनोगत व्यक्त केले. दीपप्रज्वलन आणि आचार्य विनोबा भावे यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या मान्यवरासह विनोबांच्या भुदान चळवळीत सक्रीय सहभाग देणाºया सावली येथील वयोवृद्ध नेरलवार दांपत्यांचा आयोजकांच्या वतीने शाल आणि स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. अविनाश काकडे म्हणाले, विनोबा भावे यांच्या कार्यामुळे उपेक्षित घटकांना सन्मानाने जगण्याची संधी मिळाली. समतेचा हा विचार सर्व युगात प्रेरणादायी आहे. युवकांनी हा विचार समजून घेतला पाहिजे. शिवापूर तसेच पडझरी चक परिसरातील भूदान यज्ञ मंडळाच्या जमिनीचा पट्ट्याचे मान्यवरांचे हस्ते वितरण करण्यात आले. संचालन व प्रास्ताविक एकनाथ डगवार यांनी केले. संजय सांबजवार यांनी आभार मानले. यावेळी परशुराम निमगडे, प्रकाश येनुरकर, गणेश येनुरकर, सचिन वाकडे आदी उपस्थित होते.
आचार्य विनोबांचे विचार प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 11:37 PM
आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीने माणसातील चांगूलपणाचे दर्शन घडविले.
ठळक मुद्देमहादेवभाई विद्रोही : भूदान मंडळाच्या वतीने मूल येथे जमिनीचे पट्टे वितरण