शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

राष्ट्रसंतांच्या विचारातून आदर्शगाव घडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 10:58 PM

राष्ट्रसंतांच्या साहित्यात समाज परिवर्तनाची मोठी शक्ती आहे. गावागांवात त्यांचे विचार अंगीकारल्यास राष्ट्र बळकट होण्यास मदत होईल. राष्ट्रसंतांच्या विचारांचा वसा युवकांनी पुढे न्यावा. त्यांच्या प्रेरणादायी विचारातून आदर्श गाव घडविता येईल, असे मत माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देमान्यवर : साखरीत पुतळ्याचे अनावरण

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : राष्ट्रसंतांच्या साहित्यात समाज परिवर्तनाची मोठी शक्ती आहे. गावागांवात त्यांचे विचार अंगीकारल्यास राष्ट्र बळकट होण्यास मदत होईल. राष्ट्रसंतांच्या विचारांचा वसा युवकांनी पुढे न्यावा. त्यांच्या प्रेरणादायी विचारातून आदर्श गाव घडविता येईल, असे मत माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी व्यक्त केले.राजुरा तालुक्यातील साखरी (वा.) येथे राष्ट्रसंतांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून गुरुकुंज आश्रम प्रचार विभागाचे केंद्रीय सदस्य अ‍ॅड. राजेंद्र जेनेकर, कृउबास सभापती कवडू पोटे, मारोती लोहे, प्रभाकर ढवस, शैलेश कावळे, नानाजी डोंगे, नरेंद्र मोहारे, सरपंच अर्जुन पाचपरे, किसन काळे, चंपत कावडकर, वासुदेव चटप, शेषराव बोंडे, पांडुरंग विरुटकर, गंगुबाई विरुटकर, वेकोलिचे प्रबंधक एकभरम उपस्थित होते. यावेळी अ‍ॅड. राजेंद्र जेनेकर म्हणाले, राष्ट्रसंतांचे साहित्य समाजाला प्रेरणादायी असून आपणही समाजाचे काही देणे लागते, या उदात्त हेतूने सर्वांनी राष्ट्रसंतांचे विचार तळागाळातील लोकापर्यंत पोहचविल्यासाठी प्रचार व प्रसार करण्याची विनंती त्यांनी केली. याप्रसंगी उपस्थितांनीही मार्गदर्शन केले. यावेळी दानदाते पांडुरंग विरुटकर व गंगुबाई विरुटकर यांचा अ‍ॅड. सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील मुख्य रस्त्याने ढोल-ताशांचा गजर, विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने श्री गुरुदेव सेवा मंडळ व गावकऱ्यांनी भव्य शोभायात्रा काढली.यावेळी परिसरातील श्री गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व साखरीवासीय ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन पंढरीनाथ घटे यांनी तर आभार शेषराव बोंडे यांनी मानले.