मुख्यमंत्र्यांना निवेदन: सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाचा इशाराभद्रावती : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूृर्ततेसाठी चंद्रपूर जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाने संघर्ष करण्याचे ठरविले आहे. आता जर आपल्या या मागण्या विनाविलंब सोडविल्या नाही तर आंदोलनाचा पवित्रा घेऊ, असा इशारा मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.आंदोलनाचा पहिला टप्पा १५ नोव्हेंबरपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे देऊन सुरु करण्यात येणार आहे. यानंतर १९ नोव्हेंबरपर्यंत विविध पंचायत समिती समोर हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात २१ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबरपर्यंत जिल्हा परिषद कार्यालय आणि विविध पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण करण्यात येईल. या काळात मागण्यांची पूर्तता न झाल्यास पुन:श्च याचप्रकारचे आंदोलन सुरु राहील. प्रलंबित असलेल्या मागण्यात निवडश्रेणी, खंडित सेवेच्या निराकरणाबाबत, वरिष्ठ वेतनश्रेणी, सुधारित निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्त वेतन, पाचव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन पडताळणी, डम ड्रेन्ट शिक्षकांना सुधारित वेतन श्रेणी, सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी मिळण्याबाबत, प्रवास भत्ता, भविष्य निर्वाह निधी, गटविमा, निवृत्ती वेतन महिन्याच्या एक तारखेस देण्यात यावे, या मागण्यांचा समावेश आहे. याकडे यापूर्वीही लक्ष वेधले. मात्र कुणीच लक्ष दिले नाही. (तालुका प्रतिनिधी)
मागण्या पूर्ण न केल्यास आंदोलन
By admin | Published: November 14, 2016 12:56 AM