शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
3
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
4
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
5
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
6
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
7
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
8
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले
9
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
10
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
11
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
12
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
13
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
14
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
15
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
16
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
17
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
18
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
19
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
20
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन

सुजान नेतृत्व नसेल तर समाज भरकटतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 11:59 PM

दुरदृष्टी व निष्ठावान नेता नसेल, तर समाज भरकटतो. दुदैवाने आंबेडकरी समाजात अशा प्रकारचे नेतृत्व हरवले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषितांना अधिकार मिळवून दिले.

ठळक मुद्देसुधाकर गायकवाड : बॅरि. राजाभाऊ खोबरागडे जीवनग्रंथाचे प्रकाशन

ऑनलाईन लोकमतचंद्रपूर : दुरदृष्टी व निष्ठावान नेता नसेल, तर समाज भरकटतो. दुदैवाने आंबेडकरी समाजात अशा प्रकारचे नेतृत्व हरवले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषितांना अधिकार मिळवून दिले. समाजाचा विकास केला. बॅरि. खोबरागडे यांनी बाबासाहेबांचाच विचार पुढे नेला. त्यामुळे नव्या पिढीने त्यांचा संघर्षदायी जीवनप्रवास समजून घ्यावा, असे प्रतिपादन मुंबई येथील साहित्यिक व विचारवंत सुधाकर गायकवाड यांनी केले. डॉ. इसादास भडके लिखित ‘बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे आंबेडकरी चळवळ आणि विचार’ या ग्रंथाचे लोकार्पणाप्रसंगी ते बोलत होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर गोंडवाना विद्यापीठ टिचर्स असोसिएशन व आंबेडकरी साहित्य प्रबोधिनीच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला.अध्यक्षस्थानी ज्येष्ठ रिपब्लिकन नेते प्रा. अशोक गोडघाटे तर मंचावर भीमराव वैद्य, बॅ. राजाभाऊ खोबरागडे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा प्रा. गौतमी डोंगरे- खोबरागडे, प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुधाकर पेटकर, सचिव प्रा. डॉ. प्रमोद शंभुरकर, कवी लोकनाथ यशवंत, डॉ. इसादास भडके उपस्थित होते.डॉ. भडके यांचा हा ग्रंथ आंबेडकरी चळवळीचा ज्ञानग्रंथ आहे, असे निरीक्षण प्रा. डोंगरे यांनी नोंदविले.भीमराव वैद्य व लोकनाथ यशवंत यांनी ग्रंथाचे वैशिष्ट्य अधोरेखित केले. प्रा. अशोक गोडघाटे यांनी समग्र आंबेडकरी चळवळीचा आढावा घेवून बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या निगर्वी व तत्त्वनिष्ठ व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला. डॉ. भडके यांनी मनोगत व्यक्त केले. लोकार्पण सोहळा आंबेडकरी चळवळीतील सेनानी गिरीश खोबरागडे यांच्या जयंतीचे औचित्य साधून घेण्यात आला. यावेळी प्रा. एस. टी. चिकटे व प्रसिद्ध विचारवंत प्रा. जेमिनी कडू यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.संचालन शुद्धोधन मेश्राम, प्रास्ताविक डॉ. मेघमाला मेश्राम यांनी केले. अस्मिता भडके यांनी आभार मानले. यावेळी विचारवंत ताराचंद्र खांडेकर, मारोतराव खोबरागडे, पी. व्ही. मेश्राम, अ‍ॅड. बोरकर, अंकुश वाघमारे, त्रिलोक शेंडे इ.मो. नारनवरे, डॉ. मच्छिंद्र चोरमारे, महेंद्र गायकवाड, डॉ. पी. डी. निमसटकार, नागेश सुखदेवे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.