शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

कोणी मेले तरी, आता नसतात डोळे ओले!

By admin | Published: January 05, 2015 11:00 PM

राष्ट्रसंत साहित्य विचार परिषद केंद्रीय समिती आणि श्रीगुरुदेव सेवा मंडळ ऊर्जानगर शाखेच्या वतीने आयोजित १३ वे राज्यस्तरीय राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनातील कविसंमेलन

राष्ट्रसंत साहित्य संमेलन : रंगलेल्या कविसंमेलनात श्रोते दंगरत्नाकर चटप - (कर्मयोगी तुकारामदादा गीताचार्य साहित्य नगरीतून)राष्ट्रसंत साहित्य विचार परिषद केंद्रीय समिती आणि श्रीगुरुदेव सेवा मंडळ ऊर्जानगर शाखेच्या वतीने आयोजित १३ वे राज्यस्तरीय राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनातील कविसंमेलन विदर्भ राज्यातून आलेल्या कवींच्या कवितांनी चांगलेच बहरले.पुणे येथील प्रसिद्ध कवी वादळकार, प्रा. राजेंद्र सानवणे यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. सुरेश उपगन्लावार, प्राचार्य अनिल मुसळे, ग्रामगिताचार्य बंडोपंत बोढेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या कविसंमेलनात कवींंनी गावगाड्यातील वास्तव विषय व भीषण वर्तमान काव्यातून मांडले. विसापूरचे सुनिल बुटले यांनी जागतिकीकरणात गावाचं गावपण हरवत चालल्याची खंत ‘असे कसे माझे गाव’ कवितेतून मांडली. क्षणभर रसिकालाही विचारप्रवृत्त करायला लावणाऱ्या या कवितेत ते म्हणाले..असे कसे माझे गाव पुरे बदलून गेले,कोणी मेले तरी आता नसतात डोळे ओले.रायगड येथील कवी श्रीकांत धोटे, महाराष्ट्रातील संत महात्म्यांची विशेषत: राष्ट्रसंताची मानवतावादी ओळख आपल्या कवितेतून मांडतांना म्हणाले, मानवतेचा ज्यांनी गुंफीला धागाअसे थोर झाले तुकडोजी बाबा.भंडाऱ्यांचे डोमा महाराज कापगते यांनी स्वच्छ भारत कवितेतून ग्रामस्वच्छता अभियानाचा संदेश दिला. तर रवी धारणे, कळमेश्वरचे कळसाईत गुरुजी, पद्मापूरचे खुशाल साव यांनी गावगाड्यातील वास्तव रेखाटणाऱ्या कविता सादर केल्या. नापिकीने शेती तोट्यात जात असल्याने व वेळेवर पाऊस येत नसल्याने शेतकऱ्यांचा पोरगा शेतकरी व्हायला तयार होत नाही. म्हणून राजुऱ्याचे कवी किशोर कवठे यांनी शेतकऱ्यांची व्याथ मांडतांना म्हणाले..अशी कशी रिती झाली,ढगातली शाई,वावराला रंगविण्यासरी आल्या नाही.कवी दिवाकर देशमुख यांनी राजकीय डावपेचात शेतकऱ्याविषयी सत्ता हाये स्वर्ग, शेती हाये नरक’ या भावना मांडल्या. गोंदियाच्या प्रा. ज्योती कावळे यांनी सावित्रीच्या लेकी, कवितेतून स्त्री जीवनाची ससेहोलपत मांडली. धमेंद्र कन्नाके यांनी सपन कवितेतून गरिबांची अवस्था रेखाटली. ‘व्यथा भटक्या विमुक्ताच्या’ कवितेत सतिश लोंढे यांनी भटक्याचे जीवन वर्णन केले. मार्डा येथील संगीता धोटे यांनी ‘हुंडा’ कवितेतून जनप्रबोधन केले. तर चंदू झुरमुरे यांनी प्रेमाचे नाते जपण्याचे आवाहन केले. मधूकर चापले यांनी ‘समर्पन’ कवितेत नरेंद्र दाभोळकरांच्या हत्योविषयी कोणीच का बोलत नाही? हा सवाल उपस्थित केला. भंडाऱ्याचे दिवाकर मोरस्कर यांनी झाडीबोलीतील कविता सादर करुन उपस्थितांची दाद मिळवली. तर संजय वैद्य यांनी ‘ध्येय’ कवितेतून प्रत्येकांनी आशावादी जगण्याची संकल्पना मांडली.नव्या पिढीकडून अपेक्षा बाळगताना आपल्या मुलाकडूनच वडिलांना अपेक्षा ठेवता येत नाही. या आशयाची वऱ्हाडी कवी किशोर मुगल आपल्या कवितेत म्हणाले..तिन- तिन लेकरं असूनयेक नाही कामाचं,म्हातारपण जगत आहेनाव घेत रामाचं.कविसंमेलनात ज्ञानानंद झोडे, रोशनकुमार पिलेवान, उमाकांत नारनवरे, निलेश टेकाम, प्रा. धनश्री मुसने यांनीही आपल्या रचना सादर केल्या. कविसंमेलनाचे बहारदार संचालन कवी रत्नाकर चटप व अविनाश पोईनकर यांनी केले.