शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदे, खातेवाटपाचा तिढा सुटणार? शपथविधीची आझाद मैदानावर तयारी; भाजपची उद्या नेता निवड
2
कोठडी मृत्यू प्रकरणाच्या तपासाबाबत तुम्ही गंभीर नाही; अक्षय शिंदे चकमकप्रकरणी उच्च न्यायालयाचे सीआयडीवर ताशेरे
3
मित्र दारू पिण्याचा आग्रह करताहेत काय कराल?; एमपीएससीच्या परीक्षेत प्रश्न
4
संविधानावर चर्चेस सरकार तयार; पुढील आठवड्यात चर्चा होणार
5
पोस्टल आणि ईव्हीएम मतांमध्ये फरक कसा? आ. वरुण सरदेसाई यांचा सवाल
6
ग्राहक भरपाईचे 200 कोटी बिल्डरांकडून वसूल; वसुलीसाठी सेवानिवृत्त तहसीलदारांची नियुक्ती
7
राजकारण असंतुष्ट आत्म्यांचा महासागर; नितीन गडकरींचे नेत्यांच्या वर्मावर बोट
8
पाणबुडी - नौका अपघातप्रकरणी गुन्हा; अपघातात झाला होता दोघांचा मृत्यू
9
अविनाश जाधव यांची राजीनामा नाट्यातून माघार; राज यांच्या आदेशानंतर निर्णय घेतल्याचा दावा
10
अर्जासाठीच्या दोन अटी सिडकोने केल्या शिथिल; अधिकाधिक जणांना ऑनलाइन अर्ज सादर करणे शक्य
11
जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये साकारणार आर्ट गॅलरी ; आ. राहुल नार्वेकर यांची माहिती
12
सोनिया गांधी कणखर स्वभावाच्या नेत्या, सर्वोच्च पद नाकारणे ही मोठी गोष्ट- पृथ्वीराज चव्हाण
13
"टीम इंडिया'ला भारतात जाऊन ठोकून काढा, जिंकून या"; शोएब अख्तरचा पाकिस्तानी संघाला सल्ला
14
एकनाथ शिंदे यांच्याशी भेटीनंतर भाजपाचे 'संकटमोचक' गिरीश महाजन म्हणाले- "आज मी मुद्दामून..."
15
“राहुल गांधी संविधान घेऊन सगळीकडे जातात, पण कोर्टाचे आदेश पाळत नाहीत”; कुणी केली टीका?
16
इंडिया आघाडीत मतभेद; अदानी-EVM सारख्या काँग्रेसच्या अजेंड्यावर विरोधकांमध्ये एकमत नाही
17
मनोरुग्ण भावाला शोधता-शोधता 'तोच' वेडापिसा होण्याच्या मार्गावर; महिनाभरापासून जिवाचे रान
18
अरिहंत ऑइल्स कंपनीला घातला सहा काेटींना गंडा; बनावट पावत्यांच्या माध्यमातून फसवणूक, लातुरातील घटना
19
भिवंडीत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर 'आयटक'च्या शेकडो कामगारांचे धरणे आंदोलन

पराभूत उमेदवारांना आक्षेप घ्यायचा असल्यास दीड महिना सुरक्षित राहणार 'इव्हीएम'मधील डेटा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 1:21 PM

एका उमेदवाराने नोंदविला आक्षेप : आक्षेप नोंदविण्याची मुदत संपली

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : सहाही विधानसभा मतदारसंघांतील एखाद्या पराभूत उमेदवाराने जर ईव्हीएम व मतदानाबद्दल काही आक्षेप नोंदविला तर ईव्हीएममधील डेटा पुढील दीड महिने (४५ दिवस) पोलिस बंदोबस्तात सुरक्षित राहणार आहे. त्यानंतर पराभूत उमेदवाराने आक्षेप घेतल्यास सबळ पुरावा असलेला ईव्हीएम डेटा उपलब्ध होणार नाही. शुक्रवारी (दि. २९) शेवटच्या दिवशी जिल्ह्यातून केवळ एकाच उमेदवाराने चिपसंदर्भात आक्षेप नोंदविल्याची माहिती आहे.

राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रहापुरी, चिमूर व वरोरा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाले. या निकालानंतर काही उमेदवारांकडून ईव्हीएमबाबत आक्षेप घेतले जाऊ शकतात. त्यामुळे निवडणूक आयोगाने आक्षेप नोंद‌विण्यासाठी एक प्रक्रिया ठरवून दिली आहे. त्या प्रक्रियेनुसार उमेदवारांना आक्षेप दाखल करता येते. 

निवडणूक आयोगाच्या निकषानुसार पराभूत झालेल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारास एकूण मतदान केंद्रांपैकी पाच टक्के केंद्रांच्या ईव्हीएम मशीनच्या पडताळणीची मागणी करता येते. केंद्रांवरील मतदान यंत्रांवर केवळ मतदानाचे प्रात्यक्षिक घेऊन पडलेली मते आणि व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठया पडताळून पाहता येणार आहेत. प्रत्येक यंत्रासाठी ४० हजार रुपये आणि त्यावर १८ टक्के जीएसटी असे एकूण ४७ हजार २०० रुपये इतके शुल्क आकारण्यात आल्याची माहिती आहे. उमेदवारांना आक्षेप नोंदविण्यासाठी २९ नोव्हेंबर २०२४ ही डेडलाइन देण्यात आली होती. शेवटच्या दिवशी चंद्रपूर जिल्ह्यातील एका उमेदवाराने आक्षेप नोंदविल्याची माहिती आहे. 

सुरक्षित ठेवण्याची संभाव्य कारणे चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात एकूण १८ लाख ५० हजार १०२ मतदारांपैकी १३ लाख १९ हजार ७३६ म्हणजे ७१.३३ टक्के मतदारांनी मतदान केले. एकूण ९४ पैकी राष्ट्रीय व मान्यताप्राप्त पक्षांसह ४८ उमेदवार अपक्ष होते. सर्व अपक्ष उमेदवारांसह ८० जणांचे डिपॉझिट रक्कम जप्त झाले. ईव्हीएमबाबतच्या संभाव्य आक्षेपांकरिता प्रशासनाकडून सर्व ईव्हीएम मशीन्स, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट सुरक्षित ठेवले आहेत. ४५ दिवस या मतदान यंत्रांना सुरक्षित ठेवण्यात येईल. या कालावधीत न्यायालयाने फेरतपासणी, चौकशी व मोजणीचे आदेश दिले तर प्रशासनाला या आदेशाचे पालन करता येणार आहे.

अशी असेल प्रडताळणी प्रक्रिया उमेदवाराने अनामत शुल्काचा भरणा केल्यानंतर त्यांचा अर्ज राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला जाईल. आयोगाकडून २२ डिसेंबरपूर्वी याबाबत पडताळणीची तारीख निश्चित करून दिली जाईल. त्यानुसार निश्चित तारखेला संबंधित उमेदवारांना बोलावून ही पडताळणी करून दाखविली जाईल.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024chandrapur-acचंद्रपूरEVM Machineईव्हीएम मशीनVotingमतदान