सध्याची बदलती जीवनशैली, आहारशैली आणि मानसिक ताणतणाव याचा परिणाम व्यक्तीच्या पचनसंस्थेवर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. पूर्वीचे पौष्टिक घरगुती अन्न, फळे, भाज्या या दुर्मीळ झाल्या आहेत. आता खतांचा अधिक मारा असलेला भाजीपाला सेवन करावा लागत आहे. त्यातही नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेर गेल्यावर बाहेरचे खाणे, अशुद्ध पाणी, फास्ट फूड, जंक फूड खाणे, शरीराची हालचाल न होता एकाच जागेवर दीर्घ काळ काम करत राहणे, टीव्हीसमोर तासनतास बसून जेवणे या सर्व कारणांमुळे व्यक्तींची पचनसंस्था बिघडू शकते. त्यामुळे वजन, चरबी, मधुमेह आदी आजारांबरोबरच पोटांचेही विकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत, त्यामुळे जेवन करताना शांतपणे अधिक वेळा चावून ग्रहण करणे गरजेचे आहे.
------
मूल जेवत नाहीत म्हणून टीव्ही
कार्टून लावल्याशिवाय मुलगा एकही घास खात नाही. नाइलाजाने मग टीव्ही बघत खा; पण जेवन कर म्हणून टीव्ही सुरू असते. टीव्ही बंद केली तर तो जेवतच नाही. त्यामुळे त्याच्या मनाप्रमाणे करावे लागते.
उर्वशी पांडे, पालक.
------
मुलांना जेवताना टीव्ही लागतो. टीव्ही लावला नाही तर जेवणार नाही, अशी धमकीच मुलांकडून मिळते. मग काय टीव्ही लावल्याशिवाय पर्याय नाही. टीव्ही बंद केला तर लगेच घराबाहेर खेळायसाठी जातो. कोरोनामुळे बाहेर पाठवायला भीती वाटते.
आम्रपाली मेश्राम, बल्लारपूर.
------
रात्री आम्ही सर्वजण मिळून जेवण करतो. तेव्हा टीव्ही सुरू असतेाच. सकाळी मुलाला जेवण देताना कार्टून बघत जेवण करतो. आता शाळा बंद असल्याने टीव्ही बघत जेवतो. नाहीतर शाळेतील वेळेवर तो बरोबर जेवण करतो.
प्रज्ञा गेडाम, चंद्रपूर.
-------
मुलगा सतत टीव्ही बघत असतो. कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून तर टीव्ही पाहण्याचे प्रमाण अधिकच वाढले आहे. जेवतानासुद्धा तो टीव्ही बघतच असतो.
शिला रायपुरे, चंद्रपूर.
------
ऑनलाइन शिक्षणाच्या नावाने मुलाला मोबाइल दिला. नेटचा वापरही तो करतो. जेवतानासुद्धा मोबाइल बघतच जेवत असतो. अनेकदा समजावलं त्याला डोळे खराब होतात; पण मोबाइल हिसकला तर जेवणच करत नाही.
-संजना राऊत, चंद्रपूर.
------
पोटविकार टाळायचे असतील तर...
सकाळ व सध्याकाळची जेवणाची वेळ निश्चित असावी. दररोज व्यायाम करणे गरजेचे आहे. फास्ट फूड तसेच बाहेरच्या खाण्यावर नियंत्रण असणे गरजेचे आहे.
नेहमी तणावविरहीत असावे, नियमित योगासने व प्राणायाम करावे. जेवण केल्यानंतर लगेच झोपू नये. जेवणानंतर शतपावली करावी.
सतत दगदग करू नये, जेवण करताना शांततेने प्रत्येक कण चावूनच खावा. जेवताना टीव्ही व मोबाइलचा वापर करू नये.
बॉक्स
पोटविकाराची प्रमुख खाणे
जेवणामध्ये तेलकट पदार्थाचा अधिक वापर, वेळी अवेळी जेवण करणे, जेवण केल्यानंतर लगेच झोपणे. असंतुलीत आहार घेणे. टीव्हीसमोर बसून किंवा मोबाइल बघत अधिक वेळ जेवण करत बसणे, कुठल्याही प्रकारची कष्टाची, कामाची सवय नसणे, नेहमी आळस बाळगणे, व्यायाम, प्राणायाम न करणे आदींमुळे पोटविकार होण्याची शक्यता असते.