शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
2
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
3
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
4
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
5
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
6
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
7
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
8
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
9
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
10
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
11
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
12
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
13
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
14
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
15
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
16
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
17
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
19
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
20
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)

विना परवानगी रस्ता खोदाल तर होऊ शकते गुन्हा दाखल !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 12:29 PM

मनपाकडून परवानगी घेणे बंधनकारक : अशी आहे नियमावली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सुरळीत वाहतूक व्यवस्था असावी म्हणून शासन लाखो रुपये खर्च करून रस्ते बनविते. मात्र, काही मंडळी विविध कारणांसाठी रस्ते खोदून ते पुन्हा जैसे थे करतात. हे प्रकार अगदी राष्ट्रीय महामार्ग ते गल्लीतील रस्त्यांच्या बाबतीत दिसून येतात. कोणताही शासकीय रस्ता खोदायचा असेल तर त्यासाठी संबंधित विभागाची पूर्वपरवानगी घ्यावी लागते. पण, बहुतांश मंडळी अशी कोणतीच परवानगी घेत नसल्याचेही समोर आले आहे.

शहरी भागात नगर परिषदेच्या हद्दीत नागरिक नळ कनेक्शन घ्यायचे असेल तर रस्ता सिमेंटचा असो वा डांबरी, ते फोडतात व नळ जोडून घेतात. पुन्हा त्या फोडलेल्या रस्त्याची ना दुरुस्ती होते, ना त्याकडे ती मंडळी लक्ष देऊन दुरुस्ती करून घेतात. परिणामी, तो नादुरुस्त रस्ता तसाच राहतो व त्यावरून प्रवास करणाऱ्या व्यक्तींचे हाल होतात. चंद्रपूर मनपा हद्दीत, तर अमृत योजनेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी मोठ्या प्रमाणात रस्ते खोदल्याचे दिसून येतात. मात्र संबंधित कंत्राटदाराने त्याची दुरुस्ती केली नसल्याने रस्ते खाचखडग्याचे झाल्याचे दिसून येत आहे.

रस्ता खोदण्यासाठी परवानगी आवश्यकरस्ता खोदण्यासाठी त्या त्या नागरी वा ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बांधकाम विभागाची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. त्यासाठी संबंधितांनी कुठल्या कामाच्या प्रयोजनार्थ रस्ता खोदायचा आहे, ते कारण नमूद करणे बंधनकारक असते.

तक्रारी जातात ठाण्यातएखाद्या रस्त्याचे खोदकाम झाल्यास त्या ठिकाणी कार्यकारी अभियंता, उपअभियंता व कनिष्ठ अभियंत्यांनी जागेवर जाऊन पाहणी करणे अपेक्षित आहे. खोदकाम झाल्यावर तत्काळ रस्ता पूर्ववत कसा होईल, याची जबाबदारीदेखील बांधकाम विभागावर निश्चित करण्यात आली आहे.

कोठे परवानगी घ्याल?मनपाच्या तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणारा रस्ता खोदकाम करताना संबंधित विभागाच्या परवानगीची गरज असते. मात्र, परवानगी न घेतल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो.

विना परवानगी रस्ता खोदाल तर...मनपा क्षेत्राच्या हद्दीतील रस्त्याबाबत परवानगी ही मनपा बांधकाम विभागातून घ्यावी लागत असते, तर नगरपालिका क्षेत्र व ग्रामपंचायत क्षेत्रातील असेल तर त्या त्या हद्दीतून परवानगी घ्यावी लागते. पीडब्लूडीचा रस्ता असेल तर तिथून परवानगी घ्यावी लागते.

तक्रार आल्यास कारवाई निश्चितविनापरवानगी रस्ता खोदल्यास दंडात्मक कारवाईसह पोलिस ठाण्यात संबंधितांविरूद्ध तक्रार दाखल करण्याची तजवीज आहे. त्यासंबंधी तक्रार आल्यास निश्चितपणे कारवाई केली जाते. गणोशोत्सव काळातदेखील मंडपासाठी रस्ता न खोदण्याच्या सूचना आहेत. रस्ता खोदायचा असल्यास परवानगी आवश्यक आहे. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरroad safetyरस्ते सुरक्षा