शहरं
Join us  
Trending Stories
1
Pope Francis: पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर व्हॅटिकन सिटी येथे घेतला अखेरचा श्वास
2
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना
3
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
4
WhatsApp वर चुकूनही असे फोटो डाउनलोड करू नका; तुमचे बँक खाते होईल रिकामे
5
भारताचे जावई अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच सासरी आले; ट्रेड वॉरची भेट देणार की नेणार?
6
८ दिवसांपासून शेअर विक्रीसाठी रांग, सातत्यानं लागतंय लोअर सर्किट; गुंतवणूकदारांवर डोक्यावर हात मारण्याची वेळ
7
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
8
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
9
१ मे पासून पैसे काढणे आणि बॅलन्स तपासण्यासह 'या' गोष्टी महाग होणार, किती असणार शुल्क?
10
"माझे सगळे कपडे फेकून दिले आणि...", १८व्या वर्षी उषा नाडकर्णींना आईने काढलेलं घराबाहेर
11
भारी! बालपणीच्या सुंदर आठवणींना नवा साज देणारी 'आई'; खेळण्यांपासून बनवते अप्रतिम फर्निचर
12
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
13
IRCTC कडून ७ दिवसांची जपान टूर पॅकेज; कायकाय पाहायला मिळणार? किती असणार शुल्क?
14
'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीला दाऊदपासून आहे मुलगा? दिल्लीच्या माजी कमिश्नर यांनी केलेला धक्कादायक खुलासा
15
BSNL चा धमाकेदार प्लान, ९०० रुपयांपेक्षा कमीत मिळतेय ६ महिन्यांची वैधता; बेनिफिट्सही आहेत खास
16
अवघं २ किलो वजन, १ हजार डिग्री तापमान, चीनने तयार केला अणुबॉम्बपेक्षा शक्तिशाली बॉम्ब, भारतासाठी धोक्याचा इशारा
17
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली
18
मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा
19
I Killed Monster ! माजी DGP ची हत्या करून पत्नीनं मित्राला व्हिडिओ कॉल केला अन्...

मुखदुर्गंधी, श्वासदुर्गंधी, थकवा असेल तर हे आहेत कारणे, जाणून घ्या उपाय !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 15:14 IST

Chandrapur : व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेने थकवा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे अनेक आरोग्य समस्या उभ्या राहतात. शारीरिक व मानसिक आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होतो. ज्यामध्ये मुखदुर्गंधी, श्वासदुर्गंधी, थकवा आणि स्मरणशक्तीची घट यासारख्या समस्यांचा समावेश होतो. या व्हिटॅमिनच्या कमी होण्यामुळे शरीरातील विविध कार्ये अयशस्वी होतात. त्यामुळे, व्हिटॅमिन बी १२ च्या कमी पातळीची वेळेत ओळखून उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

लाल रक्तपेशी (आरबीसी) तयार करण्यासाठी व्हिटॅमिन बी १२ आवश्यक असते. त्याच्या कमतरतेमुळे निरोगी लाल रक्तपेशींचा अभाव निर्माण होतो. जे संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी जबाबदार असतात. त्यामुळे व्हिटॅमिन बी १२ शरीरासाठी अत्यंत आवश्यक असते. 

मुख, श्वास दुर्गंधीचीही अनेकांना समस्याव्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे मुख आणि श्वास दुर्गंधीची समस्यादेखील उदभवते. तोंडातील बॅक्टेरिया आणि खराब पचन व्यवस्थेमुळे याची समस्या वाढते. वेळेत उपचार न केल्यास, या समस्येचा प्रभाव शरीरावर गंभीर होऊ शकतो.

व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेने थकवाव्हिटॅमिन बी १२ च्या कमी पातळीमुळे थकवा आणि कमजोरी येऊ शकते. जर शरीरात याची कमी झाली, तर आपल्याला ऊर्जा कमी जाणवते. तसेच संपूर्ण शरीरात अस्वस्थता आणि अजीर्णतेचा अनुभव येतो. यासाठी व्हिटॅमिन बी १२ चा पुरवठा महत्त्वाचा ठरतो. या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे अनेक समस्या निर्माण होतात.

व्हिटॅमिन बी १२ मेंदूसाठी आवश्यकव्हिटॅमिन बी १२ मेंदूची कार्यक्षमता सुधारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मेंदूच्या कार्यामध्ये सुधारणा होते. मानसिक गोंधळ, लक्षात न राहणं आणि स्मरणशक्ती कमी होणं या समस्यांपासून बचाव होतो.

"'व्हिटॅमिन बी १२' च्या कमी होण्यामुळे शरीरात अनेक लक्षणे दिसून येतात. विशेषतः मुखदुर्गंधी आणि श्वासदुर्गंधी यासारख्या समस्या वाढतात. व्हिटॅमिन बी १२ दात आणि हिरड्यांसाठी महत्त्वाचे आहे."- डॉ. श्रुती टोंगे, दंतरोगतज्ज्ञ, चंद्रपूर

टॅग्स :Healthआरोग्यLifestyleलाइफस्टाइल