झुडुपांचा विळखा : रंगरंगोटी नाही
सिंदेवाही: शहरातील मुख्य राष्ट्रीय महामार्ग असलेल्या वळण मार्ग दर्शविणारे पाथरी रस्त्यावरील दगड दुर्लक्षित आहे.
शहरातील नेहमीच वर्दळीचा पाथरी मार्ग आहे. शासकीय कार्यालय याच राष्ट्रीय महामार्गावर आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अति महत्त्वाचे विश्रामगृह आहे. नेहमीच मंत्री, आमदार-खासदार येत असतात. या व्यतिरिक्त वरिष्ठ अधिकारीही याच मार्गाने ये-जा करतात, परंतु मुख्य मार्गावरील दिशादर्शक दगड दुर्लक्षित आहे. अपघात टाळण्याकरिता दिशादर्शक दगड, किलोमीटर दगड उभे आहेत. मात्र, दिशादर्शक वाहन चालकाना दिसत नसल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. रस्त्यांवरील दिशादर्शक, किलोमीटर दगडांना रंगरंगोटी करून झुडपांचा विळखा साफ केल्यास दिशादर्शक फलकाचे महत्त्व वाढेल. यासोबतच झाडांना रेडियम लावण्याचीही मागणी आहे.