लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : इको-प्रो संस्थेच्या वतीने सुरू असलेले चंद्रपूर किल्ला-परकोट स्वच्छता अभियानास नागपूर मंडळ पुरातत्त्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी अभियानाचे कौतुक केले.चंद्रपूर शहरातील प्राचीन ऐतिहासिक गोंडकालीन किल्ला-परकोट संपुर्ण स्वच्छ करण्यासाठी इको-प्रोने किल्ला-परकोट स्वच्छता अभियान १ मार्च २०१७ पासून सुरू केले. या अभियानात इको-प्रो संस्थेच्या पुरातत्व संवर्धन विभागामार्फत नियमितपणे दररोज सकाळी ६ ते १० या वेळेत इको-प्रो नगर संरक्षक दलाचे सदस्य श्रमदान करून किल्ला स्वच्छ करण्याचे कार्य करीत आहेत. या अभियानास आजपर्यंत १४२ दिवस पूर्ण झाले आहेत.त्यामुळे या अभियानास नागपूर मंडलाचे पुरातत्व अधीक्षक एन. ताहीर, चंद्रपूरचे वरिष्ठ संरक्षण सहायक प्रशांत शिंदे यांनी रविवारी अभियानाला भेट देऊन पाहणी केली.इको-प्रोच्या माध्यमातून सुरू असलेल्या या उपक्रमाचे व सहभागी सर्व सदस्यांचे यावेळी त्यांनी कौतुक केले. अशा पध्दतीने नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाल्यास आपला वारसा संवर्धन करणे शक्य होईल. जतन करण्याकरीता पुरातत्व विभागास अशा जागृत नागरिकांची अत्यंत गरज असल्याचे मत व्यक्त केले. भविष्यात चंद्रपूर मधील वास्तु संवर्धनाकरिता पुरातत्व विभाग सुध्दा आवश्यक सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी यावेळी पुरातत्व विभागाच्या अधिकाºयांकडे चंद्रपूर परकोटाचे दुरस्ती, नव्याने बांधकाम, सौंदर्यीकरण करण्यात यावे, या परकोटावरून हेरीटेज वॉक करता यावे, समाधीस्थळी लाईट-शोच्या माध्यमातून गोंडकालीन व भोसलेकालीन इतिहास पर्यटकासमोर ठेवता यावे, प्रत्येकाला या किल्लावर सहज फिरता यावे, सकाळ-संध्याकाळ रपेट मारता यावे, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थांची सहल आयोजित करता यावी, किल्ल्यावर नियमित स्वच्छता ठेवण्यात यावी, आदी बाबीच्या अनुषंगाने पुरातत्व विभागाने स्थानीक प्रशासन व जिल्हा प्रशासनासोबत आराखडा तयार करून अंमलात आणावे, अशा मागण्या केल्या. अधिकाºयांनी याबाबत होकारार्थी आश्वासन दिले.यावेळी इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे, नितीन बुरडकर, धमेंद्र लुनावत, नितीन रामटेके, रविंद्र गुरनुले, बिमल शहा, संजय सब्बनवार, राजु काहीलकर, जयेश बैनलवार, अनिल अडगुरवार, कपील चैधरी, विनोद दुधनकर, राजु हाडगे, सुमीत कोहळे, आशीष मस्के, सुधीर देव, सुरज गुंडावार, महेश होकर्णे, सागर कावळे, वैभव मडावी, हरीश मेश्राम, अभय अमृतकर, मनीष गांवडे आदी कार्यकर्ते होते.परकोटच्या स्वच्छतेने सुंदरता प्राप्त झाली असून शहरातील अनेक गणमान्य नागरिकांकडून या मोहिमेचे कौतुक होत आहे.
इको-प्रोच्या किल्ला स्वच्छता अभियानाची पुरातत्त्व विभागाच्या अधिकाºयांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 12:42 AM
इको-प्रो संस्थेच्या वतीने सुरू असलेले चंद्रपूर किल्ला-परकोट स्वच्छता अभियानास नागपूर मंडळ पुरातत्त्व विभागाच्या
ठळक मुद्देअभियानाचे कौतुक : आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन