शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

रामपूर टी पॉईंटवर ट्रकांची अवैध पार्किंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 4:20 AM

फोटो सास्ती : राजुरा शहरालगत असलेल्या राजुरा - सास्ती - गोवरी - गडचांदुर टी पॉईंट हा जोड रस्ता आहे. ...

फोटो

सास्ती : राजुरा शहरालगत असलेल्या राजुरा - सास्ती - गोवरी - गडचांदुर टी पॉईंट हा जोड रस्ता आहे. या ठिकाणी रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहने उभी केलेली असतात. यामुळे वळण रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना समोरील वाहन दिसत नसल्याने अनेकदा अपघात झालेले आहेत. या ठिकाणावरून अनेकदा पोलीस प्रशासनाचे वाहन फिरत असते. मात्र, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

रामपूर टी पॉईंटवरून सास्ती - बल्लारपूर, गोवरी - कवठाळा, राजुरा - गडचांदूरकडे जाणारे मार्ग आहेत. यामुळे या पॉईंटवर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते. मात्र, याच टी पॉईंटवर वेकोलीतून कोळसा वाहतूक करणारे ट्रक रस्त्यावर दोन्ही बाजूंनी उभे करून वाहन चालक आपल्या घरी जात असतात. यामुळे या ठिकाणावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत असून, अनेकदा छोट्या मोठया अपघातांच्या घटना घडल्या आहेत.

या व‌ळण रस्त्यालगत घर असून, येथील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ट्रक चालकांची एवढी मुजोरी वाढली की, ते नागरिकांच्या घरासमोर वाहन उभे करून ठेवत आहेत. दररोज पोलीस प्रशासनाचे वाहन या ठिकाणी येत असतात. मात्र, या अवैध ट्रक पार्किंग करणाऱ्या वाहनांवर पोलीस कारवाई का करीत नाहीत, असा प्रश्न निर्माण होत आहे. याकडे पोलीस निरीक्षकांनी लक्ष देऊन अवैध पार्किंग वाहनांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.