लोकमत न्यूज नेटवर्कमूल : तालुक्यातील सुशी घाटातुन नियमाला डावलुन मोठया प्रमाणावर अवैध रेती वाहतुक केल्या जात आहे. या वाहतुकीमुळे परिसरातील नागरिकांची झोपमोड होत आहे. अवैध वाहतुक थांबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.चिरोली-केळझर व मूल-पोंभुर्णा परिसरातून अंधारी नदी वाहतो. या नदीतुन व सुशी घाटातुन चंद्रपूर, चिरोली व परिसरातील काही कंत्राटधारक अवैध वाहतुक करीत आहेत. सदर बाब महसूल प्रशासनाला माहित आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. तालुक्यातील अनेक घाटांचे अजुनही लिलाव झाले नाही. काही दिवसांपूर्वी बोरचांदली आणि येरगाव येथील घाटाचा लिलाव झाला. परंतु तेथील रेतीची रॉयल्टी फक्त सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामासाठीच देणे बंधनकारक असल्याची चर्चा आहे, यामुळे खासगी घरांच्या बांधकामासाठी अवैध रेतीचा सर्रास वापर केला जात आहे. तालुक्यात विविध ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. खासगी घरांचे बांधकाम मोठया प्रमाणावर सुरू असल्याचे दिसून येते. महसूल प्रशासनाने तालुक्यातील सर्वच घाटांचे लिलाव करणे गरजेचे आहे. मात्र लिलाव न झाल्याने नागरिकांना जादा दरात व अवैध रेती विकत घ्यावी लागत आहे. यामुळे नाग्ािरकांनाही याचा आर्थिक फटका बसत आहे. चिरोली, सुशी, केळझर पसिरातील अंधारी नदीतुन मोठ्या प्रमाणावर अवैध रेती वाहतुक सुरू आहे.
सुशी परिसरातून अवैध रेती वाहतूक सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:42 AM
तालुक्यातील सुशी घाटातुन नियमाला डावलुन मोठया प्रमाणावर अवैध रेती वाहतुक केल्या जात आहे. या वाहतुकीमुळे परिसरातील नागरिकांची झोपमोड होत आहे. अवैध वाहतुक थांबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : लाखोंचा महसूल बुडाला