ग्रामपंचायतचे ठाणेदारांना निवेदन
सावरगाव : येथून दोन किमी अंतरावर असलेल्या नागभीड तालुक्यातील वलनी मेंढा येथील ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये झालेल्या बैठकीत ठरलेल्या निर्णयानुसार, वलनी हद्दीतील सर्व अवैध धंदे बंद करण्याबाबत तळोधी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र खैरकर यांना शुक्रवारी निवेदन देण्यात आले.
शुक्रवारी झालेल्या ग्रामपंचायतच्या मासिक सभेमध्ये ग्रामपंचायत वलनी व मेंढा चारगांवअंतर्गत येत असलेल्या हद्दीमध्ये दारू व्यवसाय, सट्टा व्यवसाय, जुगार व्यवसाय आदी सर्व अवैद्य धंदे जोमात सुरू आहेत आणि हे धंदे करणारे बिनधास्त व्यवसाय थाटून बसले आहेत. हे सर्व अवैध धंदे बंद करण्यात यावे. याबाबत तळोधी पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी सरपंच अनिल बोरकर, उपसरपंच प्रकाश सुरपाम, ग्रा.पं.सदस्य होमदेव मेश्राम, ग्रा.पं.सदस्य दिनकर पर्वते, आशिष खोब्रागडे, संगणक चालक टाकेश्वर कोडापे आदी ग्रा.पं.पदाधिकारी निवेदन देताना उपस्थित होते. यावेळी ठाणेदारांनी ग्रामपंचायतचे पदाधिकाऱ्यांना आपल्या ग्रामपंचायत हद्दीतील अवैध धंदे पूर्णत: बंद करण्याचे आश्वासन दिले.