शासनाला निवेदन : वैद्यक परिषदेच्या कायद्यात सुधारणा करण्याची मागणीचंद्रपूर/ब्रह्मपुरी : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी इंडियन मेडीकल असोशिएशन (आयएमए) च्या वतीने बुधवारी चंद्रपूर व ब्रह्मपुरी येथे राष्ट्रव्यापी लक्षवेधी सत्याग्रह आंदोलन केले. या आंदोलनात जिल्ह्यातील आयएमएच्या ७४८ डॉक्टरांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे सकाळी ११ ते २ या तीन तासाच्या वेळात अनेक रूग्णालयाची आरोग्य सेवा विस्कळीत झाल्याचे दिसून आले. चंद्रपूर येथील जटपुरा गेटवरील महात्मा गांधी पुतळ्यासमोर आयएमएतर्फे आंदोलन करण्यात आले. यात संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद बांगडे, कार्यकारिणी सदस्य डॉ. मंगेश गुलवाडे, सचिव डॉ. पियुष मुत्यालवार, महिलाध्यक्ष डॉ. प्रेरणा कोलते, डॉ. नरेंद्र कोलते, डॉ. अतुल चिद्दरवार, डॉ. किरण देशपांडे, डॉ. अमल पोद्दार, डॉ. नसरीन मावानी आदींचा समावेश होता. तर ब्रह्मपुरी येथील आंदोलनात आयएमएचे तालुका अध्यक्ष डॉ. ख्रिजेंद्र गेडाम, सचिव डॉ. भारत गणविर, डॉ. रविशंकर आकरे, डॉ. लक्ष्मीकांत लाडूकर, डॉ. राव, डॉ. प्रेमलाल मेश्राम, डॉ. चव्हान, डॉ. अरविंद नाकाडे, डॉ. वाघमारे, डॉ. माणिक खुणे, डॉ. विजय आखाडे, डॉ. साहारे, डॉ. अतुल नागरे व आयएमएचे सभासद उपस्थित होते. चंद्रपुरात जिल्हाधिकाऱ्यांना तर ब्रह्मपुरी येथे उपविभागीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. (प्रतिनिधी)
आयएमएचे राष्ट्रव्यापी लक्षवेधी सत्याग्रह
By admin | Published: November 17, 2016 1:45 AM