बाक्स
आयुष डाॅक्टरांचा संपात सहभाग नाही
भारतीय चिकित्सा पद्धतीच्या डाॅक्टरांच्या राष्ट्रव्यापी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोशिएशन (निमा) च्या निर्णयानुसार आयुष (आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी) क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व प्रमुख संघटनांनी एकत्र येऊन आयुष कृती समिती या नावाने शिखर संघटनेची स्थापना केली. या संघटनेने ११ डिसेंबर रोजी इंडियन मेडिकल असोशिएशनने पुकारलेल्या संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती निमाच्या चंद्रपूर शाखेचे अध्यक्ष डाॅ. एल. आय. सरबेरे, सचिव डाॅ. विजय भंडारी व कोषाध्यक्ष डाॅ. अमित कोसुरकर यांनी दिली. भारतीय चिकित्सा केंद्रीय परीषदेने शल्य व शालांक्यतंत्र विषयाच्या पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डाॅक्टरांच्या शस्त्रक्रियेच्या अधिकारासंबंधी स्पष्टता देणाऱ्या राजपत्राच्या समर्थनार्थ गुलाबी फीत लावून कर्तव्य बजावण्याचा निर्णय घेतला असल्याचेही सांगितले.