बॉक्स
४८ तासात विरघळते मूर्ती
प्लॅस्टिक रंगांचा थर मूर्तीच्या बाजूला करावा. यामुळे मूर्ती लवकर विरघळते. बादलीच्या तळाशी कॅशिल्यम कार्बेनेटचा थर जमा होतो. हे तयार झालेले द्रावण दोन दिवस बाजूला ठेवल्यास कॅल्शियम कार्बेनेटचा थर पाण्यापासून वेगळा होता. गणेश मूर्तीचा काही भाग न विरघळल्यास पुन्हा नवीन बादली घेऊन त्यात सोड्याचे द्रावण तयार करावे. त्यात न विरघळलेला भाग पुन्हा घालून ढवळल्यास उरलेला भागही विरघळतो.
बॉक्स
खत म्हणून वापर करता येणार
मूर्ती विरघळून तयार झालेले पाणी अमोनियम सल्फेटयुक्त असते. यात समप्रमाणात पाणी मिसळून ते झाडांना खत म्हणूनदेखील वापरता येऊ शकते. एका कुंडीमध्ये ५०० मिलीलिटर तर मोठ्या झाडांना प्रत्येकी दोन लिटर पाणी देता येते. यामुळे झाडांची वाढ चांगली होण्यास मदत होते.
बॉक्स
असे असावे खाण्याच्या सोड्याचे प्रमाण
मूर्तीची उंची पाण्याचे प्रमाण (लिटरमध्ये) खाण्याचा सोडा (किलो)
७ ते १० इंच १२ २
११ ते १४ इंच २० ते २२ ४
१५ ते १८ इंच ५० ६
कोट
शासनाचे निर्देश असल्याने यंदा पीओपीची मूर्ती बाजारपेठेत विक्रीला आणल्याच नाही. मात्र कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून पाहिजे त्या प्रमाणात गणपतीच्या मूर्तीची बुकिंग नाही. यंदाही तशीच स्थिती दिसून येत आहे. मोठे संकट निर्माण झाले आहे.
-प्रकाश रापेल्लीवार, विक्रेता