शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

अविरत संघर्षाची फलश्रुती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 11:19 PM

घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच. पण आयुष्यात काहीतरी करून दाखविण्याची मनात जिद्द. काय करावे..असा प्रश्न डोक्यात रुंजी घालत असतानाच स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण झाली. शिकवणी लावायला हाती पैसे नाही. तरीही तो हरला नाही.

ठळक मुद्देपरिस्थिती बेताची : जिद्दीने केली स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण

परिमल डोहणे।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच. पण आयुष्यात काहीतरी करून दाखविण्याची मनात जिद्द. काय करावे..असा प्रश्न डोक्यात रुंजी घालत असतानाच स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण झाली. शिकवणी लावायला हाती पैसे नाही. तरीही तो हरला नाही. अविरत संघर्ष सुरू ठेवला अन् महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या कर सहायक परीक्षेत अनुसुचित जातीमधून तो १७ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्याच्या अविरत संघर्षाची ही फलश्रुतीच ठरली.मनात प्रबळ इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असल्यास कोणतेही दिव्य पार करता येते. हीच बाब सावलीतील निलीम मोतीलाल दुधे यांनी सिद्ध करुन दाखविली. सध्या निलीम हा नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात कक्ष सहायक या पदावर कार्यरत आहे.निलीम हा मुळचा सावलीचा रहिवासी. वडील राजकारणात सक्रीय, आई गृहिणी तर बहीण जिवती येथे अधीक्षक पदावर कार्यरत आहे. पण आपल्या मुलाने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी व्हावे, हे निलीमच्या वडिलाचे स्वप्न. आणि निलीमने एमपीएससीद्वारे नुकतीच कर सहायक पदाची परीक्षा उत्तीर्ण करुन आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे.निलीमचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सावली येथेच झाले. त्यानंतर त्याने गडचिरोली येथील शासकीय डीटीएड कॉलेजमध्ये डीटीएडचे शिक्षण घेतले. मात्र त्याच काळात शिक्षक भरती बंद झाल्यामुळे त्याने चंद्रपूर गाठून डॉ. आंबेडकर महाविद्यालयात इंग्रजी वाङ्मयात बीएला प्रवेश घेतला. आणि याच वेळेस त्याची खऱ्या अर्थाने स्पर्धा परीक्षेला सुरुवात झाली. मात्र स्पर्धा परीक्षा ही केवळ महागडे शिकवणी वर्ग लावूनच उत्तीर्ण होता येते, असा सर्वसाधारण समज. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तो शिकवणी लावू शकला नाही. अभ्यासात काही अडचणी आल्यास त्या स्वत:च सोडवायचा. चंद्रपूर येथील वाचनालयात नियमित जायचा. १० ते १२ तास अभ्यास एके अभ्यास, असेच सुरू होते. या कालवधीत त्याने ग्रामसेवक, एमपीएसी एसटीआय, शिक्षक भरती, तलाठी, युपीएससी यासारख्या अनेक परीक्षा दिल्या. अखेर २०१७ ला लोकसेवा आयोगातर्फे घेतलेल्या कर सहायक परीक्षेत त्याने यश मिळविलेच.वडेट्टीवार यांच्या हस्ते सत्कारप्रतिकूल परिस्थितीत दिवसातून १० ते १२ तास अभ्यास करुन एमपीएससीतर्फे घेतलेल्या कर सहायक परीक्षेत निलीम दुधे उत्तीर्ण झाल्याची माहिती आमदार विजय वडेट्टीवार यांना मिळताच त्यांनी सावली येथे त्याच्या घरी जाऊन त्याचा व त्याच्या यशात मोलाचा वाटा उचलणाºया आईवडिलांचा गुरुवारी सत्कार केला. यावेळी दिनेश चिटनूरवार, उपनगराध्यक्ष विलास यासलवार, विलास मुत्यलवार, गटनेता छत्रपती गेडाम, नितिन दुव्वावार, संदीप पुण्यपकार, मोहन गाडेवार, निखिल सुरमवार उपस्थित होते.