शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

‘पोक्सो’ची अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 11:29 PM

बालकांच्या लैगिंक शोषणाला प्रतिबंध करणाºया ‘पोक्सो’ कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्यात.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : डिजिटल शाळांना संगणक प्रशिक्षणाची जोड

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बालकांच्या लैगिंक शोषणाला प्रतिबंध करणाºया ‘पोक्सो’ कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्यात.पालकमंत्री फिरत्या संगणक प्रशिक्षण प्रयोग शाळेचे उद्घाटन आज गुरुवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपस्थिताना प्रातिनिधिक शपथ देण्यात आली.कार्यक्रमाला जिल्ह्यातील तंत्रस्नेही शिक्षकांची मोठया संख्येने उपस्थिती होती. याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थाचे प्रतिनिधीही उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाभरात शाळा शाळांमध्ये फिरुन मुलांना संगणक साक्षर बनविणाºया दहा बसेसचे लोकार्पण ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. या बसमध्ये विद्यार्थ्यांना संगणकासोबत बसण्याची सुविधा असून बसमध्येच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. तत्पूर्वी या विविधांगी कार्यक्रमाच्या समारोपीय भाषणात ना. मुनगंटीवार यांनी जिल्हयात टाटा ट्रस्टच्या मदतीने सुरु झालेल्या विविध उपक्रमांसाठी ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा व टाटा ट्रस्टचे आभार मानले. जिल्हा परिषदेच्या १५८५ शाळांपैकी ५७१ शाळा ई-लर्निंग शाळा झालेल्या आहेत. तंत्रस्नेही शिक्षक मुलांना प्रशिक्षण देत आहेत. आता टाटा ट्रस्टच्या मदतीने बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या वतीने संगणकबाबतचे अधिकचे शिक्षण या मुलांना मिळणार आहे. शाळेतील शिक्षकांसोबतच तज्ञांचे मार्गदर्शनही लाभणार आहे. याबद्दल ना. मुनगंटीवार यांनी समाधान व्यक्त केले. टाटा ट्रस्टच्यावतीने शासकीय यंत्रणा व सामान्य जनता यांच्यामध्ये योजनांच्या अंमलबजावणीबाबतचे मूल्यमापन केले जात आहे. गावागावांत सूक्ष्म नियोजनातून योजना पोहचवण्याची आखणी केली जात आहे. याचा जिल्हयाच्या विकासासाठी येणाºया काळात फायदा होणार आहे. यावेळी त्यांनी चंद्रपूर व गडचिरोली या जिल्हयातील सर्व नागरिकांना पुढील दीड वर्षात १०० टक्के गॅसचा पुरवठा करण्यात येणार असल्याची घोषणा केली.देशातील पहिला प्रयोग असणाºया ‘हॅलो चांदा’ या पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणेची राज्यभर चर्चा असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.जिल्हयामध्ये विविध उपसासिंचन योजना, पुनरुज्जीवित करुन शेतीचे उत्पन्न वाढविणे सुरु आहे. गोसेखूर्द प्रकल्पाचा सर्वाधिक लाभ चंद्रपूर जिल्हयाला होणार असल्याचा आशावादही ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. जिल्हयातील एक हजार कुटुंबांना कुक्कुटपालनाचे प्रशिक्षण देऊन त्यांना थेट विक्री व्यवस्थेशी जोडण्याचा करार आज आम्ही या ठिकाणी केला असून या माध्यमातून आर्थिक विकासाचे नवे पर्व जिल्हयात सुरु होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या विविध उपक्रमामध्ये प्रत्येकाने आपला वाटा उचलावा व मलाही काही द्यायचे आहे, या भावनेतून पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.यावेळी टाटा ट्रस्टचे विश्वस्थ आर.वेंकटरामन यांनी ना. मुनगंटीवार यांच्या जिद्द व चिकाटीचे कौतुक केले. टाटा ट्रस्टतर्फे विविध सामाजिक उपक्रमाला सहकार्य केले जाते. तथापि विदर्भातील नागपूरमध्ये काही उपक्रम राबविण्याचा आमचा प्रयत्न होता. मात्र सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने टाटा ट्रस्टने चंद्रपूर जिल्हयाची विविध उपक्रमासाठी निवड केली आहे.उत्तम आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्नजिल्हयातील ५८ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मार्फत जिल्ह्यामध्ये उत्तम आरोग्य सुविधा देण्याचे आपला प्रयत्न असून याबाबतही नवनवीन उपक्रम राबविण्यात येत असल्याचे ना. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. जिल्हयामध्ये मदर डेअरीमार्फत दुग्ध व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवल्या गेल्याचे सांगून त्यांनी या धवलक्रांतीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून जेएनपीटीकडून दीड कोटी रुपयांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाला जिल्ह्यात सुरुवात होत असल्याचे त्यांनी सांगितले.