हंसराज अहीर : दिशा बैठकीत आढावालोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र व राज्य पुरस्कृत शहरी व ग्रामीण विकास योजनांची जिल्ह्यात तत्परतेने अंमलबजावणी करण्यासह या योजनांच्या चालू आर्थिक वर्षातील उद्दिष्ट पूर्तीसाठी संबंधित विभागाच्या प्रमुखांनी योजनांचे योग्य नियोजन करावे. विकास योजनांची निश्चित कालावधीत अंमलबजावणी करावी, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. या योजनांचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांना मिळेल, याची दखल घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या साफल्य बचत भवनात जिल्हा विकास समन्वय सनियंत्रण समितीच्या २०१७-१८ या आर्थिक वर्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर होते. त्यावेळी त्यांनी विविध योजनांचा आढावा घेतला.या बैठकीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, राजुराचे आमदार अॅड. संजय धोटे, चंद्रपूरच्या महापौर अंजली घोटेकर, समितीचे सदस्य खुशाल बोंडे, तुळशीराम श्रीरामे, होमदेव मेश्राम, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, सदस्य सचिव जितेंद्र पापडकर, मनपा आयुक्त संजय काकडे, जिल्हा परिषद सभापती, पंचायत समिती सभापती, जि.प. सदस्य, पं.स. सदस्य, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अशोक शिरसे, कार्यन्वयीन यंत्रणाचे जिल्हास्तरीय अधिकारी आदी उपस्थित होते. उपस्थित अधिकाऱ्यांनी केंद्र व राज्य पुरस्कृत शहरी, ग्रामीण योजनांचा आढावा गृहराज्यमंत्र्यांसमोर सादर केला.त्यांनी योजनांच्या अंमलबजावणीतील अडचणी व त्रुटी उपस्थित लोकप्रतिनिधींना निदर्शनास आणून दिल्या. यावेळी ना. अहीर यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेची माहिती जाणून घेतली. या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये अनेक त्रुट्या असल्याचे सांगण्यात आले. या सभेत पं.स. सभापतींनी हा मुद्दा प्रकर्षाने उपस्थित केला होता.जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या योजनेअंतर्गत कामे करणाऱ्या मजुरांच्या वेतनाची तक्रारी मांडण्यात आली. त्याची दखल घेऊन ना. अहीर यांनी मजुरांच्या खात्यावर तत्काळ मजुरी जमा करण्याचा आदेश दिला. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकूल बांधकामाचा निधी उपलब्ध होत नसल्याने या घरकूल बांधकामाचे अनुदान संबंधित लाभार्थ्यांना तातडीने उपलब्ध होईल अशी व्यवस्था संबंधीत कार्यान्वयन अधिकाऱ्यांनी करावी.कार्यक्रमाचे संचालन कनिष्ठ प्रशासन अधिकारी अरुणा गतफणे तर आभार प्रदर्शन प्रकल्प संचालक अशोक शिरसे यांनी केले.पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विशेष सभाकेंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी कोरपना, जिवती व राजुरा तालुका क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येची गंभीर दखल घेतली आहे. ही समस्या यथाशीघ्र मार्गी लागेल, याची वरिष्ठांनी तातडीने दखल घेवून प्रभावी उपाययोजनाद्वारे हा प्रश्न सोडवावा, असे निर्देश दिले. २५ मे रोजी पाणीटंचाई संदर्भात विशेष सभा आयोजित करून या सभेत ही समस्या सोडविण्याकरिता अधिकाऱ्यांनी प्राधान्याने कार्यवाही करावी अशा सूचना दिल्या आहेत.
शहरी व ग्रामीण योजनांची अंमलबजावणी करा
By admin | Published: May 10, 2017 12:47 AM