लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: ताडोबा व्याघ्र प्रकल्पात एका वाघिणीने पर्यटकांच्या जिप्सीचा पाठलाग केल्याच्या घटनेमुळे प्रकल्प व्यवस्थापन सतर्क झाले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ताडोबाच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिप्सी चालक व गाईडना तातडीची बैठक घेऊन देण्यात आली असल्याची माहिती प्रकल्पाचे वनसंरक्षक एन आर प्रवीण यांनी लोकमतशी बोलताना दिली.वन्यजीवांचं आक्रमण यामुळे ताडोबातील पर्यटनावर विपरित परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली. ही बाब लक्षात घेऊन जिप्सींना कठडे बसवण्याच्या विचारही व्यवस्थापन करीत आहे.गेल्या दोन दिवसांत प्रकल्पाच्या कोअर आणि बफर झोनमधील दोन व्हिडीओ व्हायरल झाले. त्यातील एका व्हिडीओत जिप्सींनी एका वाघिणीला तिच्या पिल्लांसह घेरल्याचे दिसत होते. यामुळे ती रस्त्याच्या मधोमध अडकली होती. पर्यटकांकडून नियमांची वाट लावण्याचा प्रकार अंगलट येऊ शकतो, असे या व्हिडीओवरून दिसून येते. दुसऱ्या व्हिडीओत एक वाघीण एका जिप्सीचा पाठलाग करीत असल्याचे दिसले. ही वाघीण जिप्सीवर हल्लाही करू शकत होती. पण सुदैवाने असे घडले नाही. या दोन्ही घटना अंगावर शहारे आणणाऱ्या होत्या. यामुळे वन्यजीवांचे आणि पर्यटकांचे संरक्षण धोक्यात असल्याचे दिसून आले. वन्यजीवांना जवळून बघण्याच्या नादात पर्यटक जीव धोक्यात घालत आहेत. ही परिस्थिती बघता उघड्या जिप्सी बंद करून झाकलेल्या जिप्सी सुरू कराव्या, अशी मागणी आता पुढे येत आहे.या दोन घटना पुढे येताच व्यवस्थापन उघड्या जिप्सी बंद करण्याचा विचार करीत आहेत. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती ताडोबाचे संचालक एन. आर. प्रवीण यांनी दिली. जिप्सी चालक आणि गाईडना तातडीने बैठक घेऊन मार्गदर्शक सूचना आणि नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले.
आता ताडोबा व्याघ्र प्रकल्पात होणार नियमांची काटेकोर अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 2:38 PM
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात एका वाघिणीने पर्यटकांच्या जिप्सीचा पाठलाग केल्याच्या घटनेमुळे प्रकल्प व्यवस्थापन सतर्क झाले आहे.
ठळक मुद्देताडोबा वनसंरक्षक एन आर प्रवीण यांची माहिती