लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त दलित वस्त्याच्या सर्वांगीण विकास कार्यक्रमाअंतर्गत चंद्रपूर विधानसभा कामगार झोपडपट्टी प्रभागातील अनेक सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला.या कार्यक्रमाला आ. नाना श्यामकुळे, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, बालकल्याण सभापती जयर्श्री जुमडे, झोन सभापती अजय सरकार, नगरसेवक अमजद अली इरानी, नगरसेविका संगीता भोयर, समाज कल्याण विभाग उपायुक्त प्रसाद कुळकर्णी, कार्यकारी अभियंता सा.बां. विभाग संतोष जाधव आदी मान्यवर तसेच परिसरातील नागरिक याप्रसंगी उपस्थित होते.या प्रसंगी ना. हंसराज अहीर म्हणाले, दलित वस्त्यांमध्ये सर्वांगीण सुविधा देवून विकास करण्याचे धोरण शासनाचे असल्याने आ. नाना शामकुळेंनी मोठा निधी खेचून आणत सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून कामगार झोपडपट्टी प्रभागातील दलित वस्तीमध्ये कोट्यवधीची कामे सुरू केली आहेत. त्यामुळे दलित वस्तीचे स्वरूपच बदलत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या कार्यकाळात या क्षेत्राचा विकास झाल्याचे सुध्दा ना. अहीर यांनी यावेळी सांगितले.आ. नाना श्यामकुळे यांनी विकास कार्याचा आढावा घेत दलित वस्तींच्या विकासासाठी तसेच अन्य ठिकाणी सर्व सोयींनी युक्त असा विकास करण्यासाठी पुन्हा निधी खेचून आणू, असे सांगत भाजपच्या राजवटीत या शहराचा सर्वंकष विकास होत असल्याचेसुध्दा त्यांनी यावेळी सांगितले.याप्रसंगी महापौर अंजली घोटेकर यांनीसुध्दा विकासासाठी कटीबध्द असून महानगरात ना. सुधीर मुनगंटीवार व ना. हंसराज अहीर तसेच आ. नाना श्यामकुळे यांच्या माध्यमातून मोठया प्रमाणात विकास होत असल्याचे सांगितले.महानगरात एकूण १० ठिकाणी सिमेंट कॉंक्रीट रस्त्याचे बांधकाम होत आहे. या कार्यक्रमाला पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक व वॉर्डातील नागरिक उपस्थित होते.
दलित वस्त्यांची सुधारणा करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 10:59 PM
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त दलित वस्त्याच्या सर्वांगीण विकास कार्यक्रमाअंतर्गत चंद्रपूर विधानसभा कामगार झोपडपट्टी प्रभागातील अनेक सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला.
ठळक मुद्देना. हंसराज अहीर : चंद्रपुरात दहा ठिकाणी सिमेंट काँक्रीट रस्ते होणार