शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

कर्नाटका एम्प्टा प्रकरणात खासदार धानोरकरांच्या बंधुसह नऊ जणांवर रात्री गुन्हे दाखल

By राजेश भोजेकर | Updated: June 20, 2024 12:48 IST

भद्रावती तालुक्यातील  कर्नाटक एम्टा खुल्या कोळसा खाणीत आंदोलनकारी केपीसीएल अधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना आंदोलनकर्ता निलेश भालेराव याने केपीसीएल अभियंता शिवप्रसाद यांच्या श्रीमुखात हाणली.

चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील  कर्नाटक एम्टा खुल्या कोळसा खाणीत आंदोलनकारी केपीसीएल अधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना आंदोलनकर्ता निलेश भालेराव याने केपीसीएल अभियंता शिवप्रसाद यांच्या श्रीमुखात हाणली. या प्रकरणी रात्री उशिरा अभियंता शिव प्रसाद यांच्या तक्रारीवरून निलेश भालेराव व खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे यांच्यासह नऊ जणांवर शासकीय काम करीत असताना मारहाण केल्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुन्हा आंदोलन पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. खाण परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.

बरांज गावाचे पुनर्वसन करावे व स्थानिकांना रोजगार द्यावा, यासह १६ मागण्यांना घेऊन खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात काँग्रेसने बुधवारी (दि. १९) सकाळी ११ वाजता बरांज येथील कर्नाटक एम्टा खाण परिसरात आंदोलन सुरू असताना एका आंदोलनकर्त्याने केपीसीएल कंपनी अभियंत्याच्या श्रीमुखात हाणल्याने मोठा तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. दरम्यान, काँग्रेस कार्यकर्ते व प्रकल्पग्रस्तांनी आक्रमक भूमिका घेऊन कोळसा खाणीतील कामकाज आज दिवसभर बंद पाडले.

केपीसीएल कंपनीने कोळसा खाणीसाठी जमीन अधिग्रहित केली. मात्र, बरांज गावाचे पुनर्वसन व स्थानिकांच्या रोजगारासह अन्य १६ मागण्या सोडविल्या नाही. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी तत्कालीन आमदार व नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात काँग्रेसतर्फे खाण परिसरात आंदोलन केले होते. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी खाण व्यवस्थापनाला सहा महिन्यांचा अल्टिमेटम दिला होता. कालावधी पूर्ण झाल्यानंतरही कंपनीने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज प्रकल्पग्रस्तांना सोबत घेऊन खाण परिसरात आंदोलन सुरू केले. दरम्यान, कंपनी अधिकाऱ्यांना जाब विचारला असता प्रकल्पग्रस्तांची एकही मागणी पूर्ण न केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते व प्रकल्पग्रस्तांनी कर्नाटका एम्टा कंपनीविरोधात नारेबाजी केली. दरम्यान, बाचाबाची होऊन निलेश भालेराव नावाच्या कार्यकर्त्याने केपीसीएलचे मुख्य अभियंता शिवकुमार यांच्या श्रीमुखात हाणल्याने मोठा तणाव निर्माण झाला.

यापूर्वी उद्धवसेना जिल्हाप्रमुखाने केली होती मारहाण

कर्नाटक एम्टा खुल्या कोळसा खाण परिसरात तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आजही तणावपूर्ण वातावरण आहे. सहा महिन्यांपूर्वी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतरही खाण व्यवस्थापनाने काहीच हालचाली केल्या नाही. प्रशासनानेही ही बाब गांभीर्याने घेतली नसल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये कामालीचा रोष आहे. यापूर्वी उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनीही मागीलवर्षी २ ऑक्टोबरला कंपनीत एका कामगाराचा हृदयविकाराने मृत्यू झाला असता त्याच्या कुटुंबियांना योग्य मोबदला द्यावा म्हणून आंदोलन केले होते. तेव्हाही मारहाणीचा प्रकार घडला होता. जीवतोडे यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्धही गुन्हे दाखल झाले होते. असे प्रकार थांबविण्यात प्रशासन कमी पडत असल्याचा आरोप होत आहे. आंदोलक पुन्हा आंदोलनाच्या तयारीत असल्याची माहिती आहे.