कीर्तीवर्धन दीक्षित : खेळ भावनेचा विकास व्हावाचंद्रपूर : जिल्ह्यातील विसापूर येथे २५ वी मुले आणि १८ व्या मुली सब ज्युनिअर आट्या-पाट्या राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू व राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित यांच्या हस्ते शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले. यावेळी डॉ. दीक्षित यांनी आट्या-पाट्या खेळातून खेळ भावनेचा विकास व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.यावेळी मंचावर महाराष्ट्र अॅथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. दिलीप जैयस्वाल, राज्य आट्या-पाट्या महामंडळाचे सचिव डॉ. दीपक कविश्वर, गोंडवाना विद्यापीठ शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक कोहळे, प्राचार्य डॉ. वेगीनवार, प्राचार्य डॉ. संजय सिंग, डॉ. वरभे, शासकीय कबड्डी प्रशिक्षक डॉ. बोंडे, श्रीमती जयस्वाल, जिल्हा कोषाध्यक्ष विजय लडके आदी उपस्थित होते.स्पर्धा संयोजक समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. दिलीप जैस्वाल यांच्या हस्ते माजी कुलगुरू प्राचार्य दीक्षित व छत्रपती पुरस्कार विजेते प्राचार्य डॉ. कविश्वर यांचा तर प्राचार्य डॉ. दीक्षित यांच्या हस्ते महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. दिलीप जयस्वाल यांचा सत्कार करण्यात आला. राज्य महामंडळाचे सचिव डॉ. कविश्वर यांनी प्रास्ताविक केले. तर जिल्हा संघाचे सचिव प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर यांनी संचालन व आभार प्रदर्शन केले. स्पर्धेत राज्यातील २८ जिल्ह्यातील मुला-मुलींचे आट्या-पाट्या संघ सहभागी झाले आहेत. प्रथम मुले (उस्मानाबाद), द्वितीय- वासीम, तृतीय- भंडारा, मुली- प्रथम उस्मानाबाद, द्वितीय वासीम, तृतीय (चंद्रपूर) खेळाडू, संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक व अधिकारी मिळून अंदाजे ५०० लोकांच्या निवास व भोजनाची व्यवस्था जिल्हा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. स्टेट चॅम्पिनशिपच्या या आंतरजिल्हा स्पर्धेतून राष्ट्रीय आट्या-पाट्या स्पर्धेसाठी संघाची निवड केली जाणार आहे. (प्रतिनिधी)
राज्यस्तरीय आट्यापाट्या स्पर्धेचे उद्घाटन
By admin | Published: July 11, 2016 12:50 AM