पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश : शहरी विभागातील प्रधानमंत्री आवास योजना चंद्रपूर : केंद्र सरकारच्या शहरी विभागातील प्रधानमंत्री आवास योजनेत जिल्ह्यातील बल्लारपूर, ब्रम्हपुरी, भद्रावती व वरोरा या शहरांचा समावेश करण्यात आला आहे. राज्याचे वित्तमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सतत पाठपुरावा केल्याने हे यश आले आहे. केंद्र सरकारच्या गृहनिर्माण विभागाने ३ आॅगस्टच्या पत्रान्वये महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागाला पत्र पाठवून राज्यातील ९१ शहरांचा या योजनेअंतर्गत समावेश केल्याचे कळविले आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, ब्रम्हपुरी, भद्रावती व वरोरा या शहरांचा समावेश आहे. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) या योजनेअंतर्गत शहरी भागातील गरिबांना या योजनेचा लाभ मिळणार असून लाभार्थ्यांचे भारतात कुठेही पक्के घर नसावे हा या योजनेचा मुख्य निकष आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या लाभार्थ्यांसाठी वार्षीक उत्पन्न ३ लाख तसेच मध्यम वर्गीयांसाठी वार्षीक उत्पन्नाचे ३ लाख ते ६ लाख या मर्यादेत असने आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत भारत सरकारच्या वतीने २.५० लक्ष रूपये अनुदान दिले जाणार आहे. बल्लारपूर, ब्रम्हपुरी, भद्रावती व वरोरा या शहरातील बेघर नागरिकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)जिल्हा क्षय रुग्णालयाला मिळणार नवीन इमारतवित्तमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर येथील जिल्हा क्षय रूग्णालयाच्या नविन इमारत बांधकामासाठी २ कोटी २५ लक्ष ७८ हजार ६४० एवढ्या रकमेच्या अंदाजपत्रक व आराखडयाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने १९ आॅक्टोबरच्या शासन निर्णयान्वये चंद्रपूर जिल्हा क्षय रूग्णालयाच्या नविन इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. या रूग्णालयासाठी १ कोटी ९९ लक्ष रकमेच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. कामाच्या अंदाजपत्रकातील चार टक्के आकस्मिक खर्च, पाच टक्के सेंटेज चार्जेस तरतुद करण्यात आली आहे. अंतर्गत विज जोडणीसाठी सहा टक्के तरतुद करण्यात आली आहे. याप्रमाणे एकुण २ कोटी २५ लक्ष ७८ हजार ६४० एवढ्या रकमेच्या अंदाजपत्रक व आराखडयाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या रूग्णालयाच्या नविन इमारत बांधकामाची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या सततच्या प्रयत्नाने ही मागणी अखेर पुर्णत्वास आली आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेत बल्लारपूर, ब्रह्मपुरी, भद्रावती व वरोरा शहराचा समावेश
By admin | Published: October 26, 2016 1:00 AM