मालमत्ता कर, पाणीपट्टी कर, लिलाव यातून येणारे उत्पन्न ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीच्या फंडात जमा केले जाते. या फंडामधून दैनंदिन किरकोळ कामे, चपराशी मानधन, पाणी पुरवठा कर्मचारी वेतन, किरकोळ साहित्य खरेदी, स्टेशनरी, बांधकाम याशिवाय परिस्थितीनिहाय गावात निघणारी तातडीची कामे केली जातात. विशेषत:आर्थिक वर्ष संपण्याच्या मार्च महिन्यातही वसुली मोहीम मोठ्या प्रमाणात राबविली जाते आहे. कोरोनामुळे कर वसुलीवर याचा परिणाम झाला होता. मात्र यावेळी वसुलीसाठी वसुली पथक गावात दाखल होऊनही वसुली पाहिजे त्या प्रमाणात झाली नाही. मात्र गावात शिधापत्रिका तपासणी नमुना राबविण्याची मोहीम घेतल्याबरोबर वसुलीत वाढ होत आहे. शिधापत्रिका तपासणी नमुनासाठी पुरावा म्हणून दहापैकी एक पुरावा म्हणून कागदपत्रे सादर करावयाचे आहेत. भाडेपट्टीची अट घातली आहे, मात्र सदर तपासणी करण्यासाठी दहा कागदपत्रे लागत असताना आज मात्र घरपट्टी अनिवार्य आहे, असे सांगून गृहकर वसुली सक्तीने केल्या जात असल्याचे दिसत आहे. यामुळे गृह, पाणीकराच्या वसुलीत वाढ होत आहे.
कोट
रेशनकार्ड नूतनीकरण करणासाठी दहा कागदपत्रापैकी एक कागदपत्राची गरज आहे. परंतु तो पुरावा एक वर्षापेक्षा जास्त नसावा, यामध्ये भाडेपट्टी, आधार कार्ड, बँक पासबुक, मोटार लायन्सन्स, मतदार ओळखपत्र, विजेचे देयक, मोबाईल देयक, मालकीचा पुरावा, यापैकी एक पुरावा मात्र एक वर्षाचा निवासी असावा.
-संजय पाटील
स्वस्त धान्य दुकानदार
पळसगाव.