यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, मनपा आयुक्त राजेश मोहिते, अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड आदी उपस्थित होते. पालक सचिव अनुप कुमार म्हणाले, कोरोनाच्या दोन्ही लस सुरक्षित असून जागतिक आरोग्य संघटना व संस्थांची मान्यता आहे. भारतीय बनावटीची लस जगातील अनेक देशामध्ये निर्यात करण्यात आली. त्यामुळे कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये. काही नागरिकांना कोरोना लस पहिला डोज घेतल्यानंतर २८ दिवसानंतर दुसरा डोज घेण्याबाबत संगणकीय प्रणालीतील अडचणीमुळे एसएमएस मिळाला नाही तरी संबंधित केंद्रावर थेट जाऊन दुसरा डोज घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदिप गेडाम, आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम व अन्य अधिकारी उपस्थित होते.
जादा लसींसाठी पाठपुरावा
जिल्ह्याकरिता वाढीव लस साठा मिळावा, अशी मागणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राठोड यांनी केली असता मुख्य सचिवांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन पालक सचिव अनुप कुमार यांनी दिले. माझे कार्यक्षेत्र माझी जबाबदारी हा उपक्रम व दुसºया लाटेविरूद्ध प्रशासनाने केली तयारी याबाबत जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी माहिती सादर केली. मास्क न वापरणाऱ्या वाहनचालकांना वाहन क्रमांकाचे मोबाइलद्वारे छायाचित्र घेऊन कारवाई करण्याची माहिती पोलीस अधीक्षक साळवे यांनी दिली.