चंद्रपूर: सन २०२२-२३ मध्ये पुरेसा पाऊस पडल्याने जमिनीत असलेला ओलावा आणि चणा (हरभरा) पिकासाठी अनुकूल नैसर्गीक परिस्थिती यामुळे यंदा जिल्ह्यात चणा पिकाच्या उत्पादनात विक्रमी वाढ झाली. असे असले तरी, शासनाने मागील पाच वर्षांपूर्वी ठरवून दिलेल्या प्रति हेक्टरी ७५० किलो अशा अल्प स्वरूपाच्या उत्पादकतेमुळे सरकारी चणा खरेदी केंद्रांवर अल्प उत्पादकतेत चणा विकल्यानंतर शेतकऱ्यांना उर्वरीत चणा खाजगी व्यापाऱ्यांना कवडीमोल भावाने विकावा लागत होता, त्यामुळे चणा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त होते.
या गंभीर प्रश्नासंदर्भात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची भेट घेतली या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी सदरची गंभीर बाब पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आणून देत चंद्रपूर जिल्ह्यातील चणा उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासनाने योग्य उत्पादकता लागू करण्यासंदर्भात निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, अशी आग्रही विनंती केली.
देवराव भोंगळे यांच्या विनंतीनुसार, सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्हा कृषी विभागाची चालू वर्षाकरिता सुधारीत अंदाजित पुर्वानुमानानुसार चणा (हरभरा) पिकांची अंदाजित उत्पादकता ही प्रती हेक्टरी १२०६ किलो इतकी घेण्यात आली असल्याने त्यानुसारच शासनाने जिल्ह्याकरीता खरेदी परवानगी द्यावी, अशी मागणी शासनदरबारी लावून धरली आणि त्यासंदर्भाने सातत्याने पाठपुरावा केला. मुनगंटीवारांच्या यांच्या प्रयत्नामुळे शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील चणा (हरभरा) उत्पादकता हेक्टरी ७५० किलो वरून १२०६ किलो करण्यासाठी मान्यता प्रदान केली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील चणा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुधीर मुनगंटीवार हे नेहमीचं “दिलेला शब्द, पुर्ण करतात” जिल्ह्यातील चणा उत्पादक शेतकरी बांधवांच्या मागणीला सुद्धा त्यांनी प्राथमिकता दिली. आणि मागील पाच वर्षांपासून चणा पिकासाठी ठरवून दिलेला ७५० किलो प्रति हेक्टरी उत्पादकता शासन स्तरावरून वाढवून घेत १२०६ किलो प्रती हेक्टरी अशी नवीन उत्पादकता लागू केल्याने जिल्ह्यातील चणा उत्पादक शेतकऱ्यांना याचा निश्चितचं फायदा होईल. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील चणा उत्पादक शेतकऱ्यांचे हे बहुप्रलंबीत प्रश्न सुटल्याने सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्ह्यातील चणा उत्पादक शेतकऱ्यांनी आभार मानले आहे.