लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात व राज्यात सामूहिक सहभागाचे जनताभिमुख उपक्रम राबवणारे वित्त, नियोजन व वनमंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी मिशन सेवा या अभिनव प्रयोगाची सुरुवात चंद्रपूरमध्ये केली. केंद्रीय व राज्य सेवा स्पर्धा परीक्षांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणांचा टक्का वाढावा, यासाठी या आगळ्यावेगळ्या मिशन सेवा उपक्रमाची आखणी करण्यात आल्याची माहिती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात १४ डिसेंबरला आयोजित करण्यात आलेल्या एका शानदार सोहळ्यामध्ये मिशन सेवा अभियानातील दुसऱ्या टप्प्याची सुरुवात करण्यात आली. यावेळी ना. मुनगंटीवार बोलत होते. मिशन सेवा अंतर्गत या आधी चंद्रपूर येथील प्रशस्त अशा बाबा आमटे अभ्याशिकेस 'मिशन सेवा एडिशन' या विशेष प्रकारच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले होते.मिशन सेवांतर्गत राज्य शासनामार्फत होणाºया स्पर्धा परीक्षांमध्ये तज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्रशिक्षण तसेच आवश्यक अभ्यास साहित्याचे वाटपही या योजनेमध्ये केले जाणार आहे. तथापि, या योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता जिल्ह्यातील परीक्षेसाठी पात्र असणाºया युवकांना एमपीएसी पूर्वपरीक्षेचे सराव परीक्षेसाठी आॅनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. हॅलो चांदा या मोबाईल अॅपवरदेखील याबाबत लिंक देण्यात आली आहे. या सराव परीक्षा सत्रातील पहिली परीक्षा ही २३ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये घेण्यात येणार आहे.सदर परीक्षेचे प्रश्न संच हे पुणे येथील नामवंत संस्थेमार्फत तयार करण्यात आले असून हे सत्र विद्यार्थ्यांकरिता पूर्णपणे विनामूल्य राहील. अशा प्रकारच्या सत्राचे आयोजन पुढे ही प्रत्येक रविवारी करण्यात येईल.आदिवासीबहुल चंद्रपूर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना महाराष्ट्रात सुरू होणाºया मेगा भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात यश मिळावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने मिशन सेवा अंतर्गत प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि परीक्षा घेण्याचा संकल्प केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी यासंदर्भात सराव परीक्षेचेदेखील आयोजन करण्यात आले. निवडक मुलांना या परीक्षेसाठी प्रत्येक तालुक्यातून तयार केले जाणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनात नव्याने लागलेल्या सर्व अधिकाºयांचे मार्गदर्शन ठिकठिकाणी मुलांना दिले जाणार आहे.याशिवाय पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत होणाºया बैठकीमध्ये मुलांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या आयोजनात सहभागी असणाºया संस्थांना व मान्यवरांनादेखील पाचारण करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. पुढील दोन महिन्यांमध्ये चंद्रपूर येथे परीक्षेस पात्र असणाऱ्या मुलांना तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन व्हावे, यासाठी युवकांचा मेळावा घेण्याचेही संकेत ना. मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.आजच्या या शुभारंभाच्या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, चंद्रपूरच्या महापौर अंजली घोटेकर, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा नियोजन अधिकारी जी.आर. वायाळ, जिल्हा समन्वयक सुनील धोंगडे यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख आणि अधिकारीवर्ग उपस्थित होते.नामवंत मार्गदर्शक आणणारस्पर्धा परीक्षांमध्ये ज्या मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनाने महाराष्ट्रातील तरुण पिढी घडविली आहे. अशा प्रख्यात, नामवंत मार्गदर्शकांना यासाठी चंद्रपूरमध्ये पाचारण करण्यात येणार आहे. युवकांच्या मेळाव्यात आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात येणाऱ्या मार्गदर्शन केंद्रामध्ये परीक्षेला सामोरे जाण्याचे मार्गदर्शन तज्ज्ञांमार्फत करण्यात येणार आहे. शुक्रवारी झालेल्या या बैठकीमध्ये आॅनलाइन रजिस्ट्रेशनचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पहिले रजिस्ट्रेशन करणाºया युवकाला शुभेच्छा देण्यात आल्या.
भरतीत चंद्रपूरचा टक्का वाढवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 10:38 PM
चंद्रपूर जिल्ह्यात व राज्यात सामूहिक सहभागाचे जनताभिमुख उपक्रम राबवणारे वित्त, नियोजन व वनमंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी मिशन सेवा या अभिनव प्रयोगाची सुरुवात चंद्रपूरमध्ये केली. केंद्रीय व राज्य सेवा स्पर्धा परीक्षांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणांचा टक्का वाढावा, यासाठी या आगळ्यावेगळ्या मिशन सेवा उपक्रमाची आखणी करण्यात आल्याची माहिती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : चंद्रपूरमध्ये मिशन सेवा अभियानाची सुरुवात