चंद्रपुरातील सूरजनाथ कोडापे आणि राजुरा येथील नितीन सदाशिव घोरपडे यांनी जिल्हा परिषदेकडे तक्रार केल्यानंतर प्रशासनाने पोलिसात कागदपत्रांसह तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी बल्लारपुरातील सरदार पटेल वॉर्ड, सास्ती रोड येथील आरोपी ब्रिजेशकुमार झा याच्याविरुद्ध भादंवि ४६५, ४६८, ४७९, ४२० अन्वये १७ सप्टेंबर २०२१ रोजी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच तो फरार झाला. रामनगर पाेलिसांनी आठ जणांचे पथक तयार केले होते. दरम्यान, शनिवारी त्याला नागपूर कळमना येथून तपास अधिकारी विनोद बुरले यांच्या पथकाने अटक केली. बुधवारी त्याची पोलीस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयात हजर केले असता, दोन दिवस पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली असल्याची माहिती तपास अधिकारी बुरले यांनी दिली.
बोगस नियुक्तीपत्र देणाऱ्या आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 4:32 AM