आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : महाजेनकोमधील कार्यरत तरुण अभियंत्यांनी अभिनव कार्यपद्धती वापरून संकटावर मात करावी आणि उत्पादन वाढवावे, असे आवाहन महाऔष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता प्रदीप शिंगाडे यांनी केले. उर्जानगरातील निर्माण भवनात आयोजित संकल्प दिनाप्रसंगी ते बोलत होते.समारोपीय कार्यक्रमात प्रमुख पाहुणे आभाषचंद्र सिंग, विद्यानंद डोंगरे, अभय खोब्रागडे, समीर गादेवार उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून करण्यात आली. याप्रसंगी महाजनकोचे ‘स्फूर्ती गीत’ सादर करण्यात आले. उपमुख्य अभियंता विद्यानंद डोंगरे यांनी आस्थापना विभागातील अभियंताचे प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे आव्हान व वेळोवेळी आलेल्या संकटावर मात करून प्रकल्प पूर्ण केल्याबद्दल अभियंताचे कौतुक केले. यावेळी प्रश्नमंजुषा स्पर्धाही घेण्यात आली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.आभाषचंद्र सिंग म्हणाले, महाजनकोचे उर्जा क्षेत्रातील भरीव योगदान आहे. मात्र, दिवसेंदिवस नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत कमी कोळशाचा वापर करून उत्पादनाचे लक्ष्य गाठले पाहिजे. अभियंत्यांनी वीज उत्पादन आणि विविध उपाययोजना केल्याबद्दल कौतुक केले. संचालन हार्दिक सोनी व प्रदीप श्रीरामे यांनी केले. आभार पवन बोधे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी सुरक्षा अधिकारी प्रशांत कठाळे, कार्यकारी अभियंता संजय कांबळे, नितीन कांबळे, रूपेश शेवाळे, देवगाकर, थेटे, महाजन, महेशगौरी, सर्व अति.कार्यकारी अभियंता, स्वप्नील ठाकरे, शंकर चवरे, आदित्य मोहरील, श्रीधर वाराणसी, देवगडे आदींनी परिश्रम घेतले.
संकटावर मात करून वीज उत्पादन वाढवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:32 AM
महाजेनकोमधील कार्यरत तरुण अभियंत्यांनी अभिनव कार्यपद्धती वापरून संकटावर मात करावी आणि उत्पादन वाढवावे, .....
ठळक मुद्देप्रदीप शिंगाडे : ऊर्जानगरातील निर्माण भवनात संकल्प दिन