ठळक मुद्दे५ टक्क्यांनी वाढले व्याघ्र दर्शनाचे दर
लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय ठरलेला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सफारी शुल्कात ५ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. क्षेत्र संचालकांनी नवे शुल्क जाहीर केले असुन पर्यटकांना आता दुप्पटीने बोजा सहन करावा लागणार आहे.ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सफारीसाठी जगभरातून आॅनलाईन नोंदणी केली जाते. साधारण व तत्काळ आरक्षणाचे शुल्क दुप्पटीने वाढविले. शिवाय सोमवारपासून स्थळ बुकिंग बंद करण्यात आले आहे.ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने पहिल्यांदाच ५ टक्क्यांनी वाढ केल्याने पर्यटकांची संख्या रोडावण्याची भीती व्यक्त केली जात आहे.