जिवती : तालुक्यातील अनेक गावातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे प्रवास करताना विविध अडचणी येतात. यातच विविध आजार वाढले आहेत. याकडे लक्ष देवून रस्त्यांची दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे.
शौचालयाचा वापर आजही कमीच
चंद्रपूर : स्वच्छ भारत अभियानातंर्गत जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये शासनाने वैयक्तिक शौचालय बांधून दिले आहे. असे असतानाही आजही जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही नागरिक शौचालयाचा वापर न करताच बाहेर जात असल्याने ग्रामीण भागातील स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहे. विशेषत: सिंदेवाही, सावली, राजुरा, जिवती तालुक्यातील अनेक गावांत अस्वच्छता बघायला मिळते.
रस्त्याचे सिमेंटीकरण करण्याची मागणी
चंद्रपूर : येथील तुळशीनगर परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देवून येथील रस्त्यांची दुरुस्ती करून दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
पतसंस्था आल्या अडचणीच
चंद्रपूर : कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. त्यामुळे घेतलेले कर्ज तसेच अन्य ठेवी भरण्यासाठी सामान्य नागरिकांकडे पैसाच नसल्याने पतसंस्थाही अडचणीत आल्या आहेत. जिल्ह्यात मोठ्या संख्येने पतसंस्था आहे. मात्र काही बोटावर मोजण्याइतक्याच संस्था सुस्थितीत असून अन्य पतसंस्था मात्र सध्यातरी आर्थिक अडचणीत आल्या आहे.
व्यावसायिकांवर कारवाईची मागणी
चंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी उघड्यावर अन्नपदार्थाचा विक्री केली जात आहे. कोरोनामुळे सर्वत्र स्वच्छतेवर भर दिला जात आहे. असे असले तरी काही ठिकाणी अन्नपदार्थाची उघड्यावरच विक्री केली जात आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. याकडे विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.