लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : साधारणतः खांद्याच्या दुखण्याकडे बरेचदा दुर्लक्ष केले जाते. मात्र, असे करणे धोक्याचे ठरू शकतो. यातून 'फ्रोझन शोल्डर' होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे अधूनमधून खांदे दुखत असल्यास वेळीच अस्थिरोग तज्ज्ञांना दाखवून उपचार करावा, असा सल्ला अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. सुनील मल्लोजवार यांनी दिला आहे.
साधारणतः वयाच्या चाळिशीनंतर फ्रोझन शोल्डरचा धोका अधिक असतो. खांदे दुखणे आणि नीट काम न करणे ही त्यातील प्रमुख लक्षणे आहेत. फ्रोझन शोल्डरमुळे माणसाला दैनंदिन काम करतानाही खूप अडचणी येतात.
काय काळजी घ्याल? फ्रोझन शोल्डर साधारणतः वयाच्या चाळिशीनंतर होण्याचा धोका असतो. महिलांना अधिक धोका असतो. खांद्याची नियमित हालचाल करणे गरजेचे आहे. नियमित व्यायाम करावा, एखाद्या वेळेस अपघात झाला आणि योग्य उपचार झाला नाही तर फ्रोझन शोल्डर होण्याचा धोका अधिक असतो.
फ्रोझन शोल्डर' म्हणजे काय? फ्रोझन शोल्डर ज्याला 'अॅड- हेसिव्ह कॅप्सुलिटिस देखील म्हणतात. खांद्याच्या सांध्यामध्ये आखडलेपणा आणि त्यातून होणाऱ्या वेदनांचा सामना करावा लागतो. फ्रोझन शोल्डरची चिन्हे आणि लक्षणे खूप हळूहळू दिसायला लागतात.
मधुमेह, थायरॉईडच्या रुग्णांना धोका अधिक मधुमेह, थायरॉईडच्या रुग्णांमध्ये फ्रोझन शोल्डरचा धोका १० ते २० टक्के असतो. फ्रोझन शोल्डरची समस्या लगेच सुटत नाही. ते बरे होण्यासाठी बराच वेळ लागतो.
फ्रोझन शोल्डरची कारणे खांद्याच्या जॉइंटच्या बाहेर एक कॅप्सूल असते, गोठलेल्या खांद्यामध्ये ही कॅप्सूल कठोर किंवा कडक होते, ज्यामुळे खांद्याची हालचाल खूप कमी होते. या समस्येचा सामना कोणालाही होऊ शकतो; परंतु, दीर्घकाळ खांदा स्थिर राहिल्यानंतर, जसे की शस्त्रक्रिया किंवा हातास फ्रैक्चर झाल्यानंतर फ्रोझन शोल्डर होण्याची शक्यता असते.
ऐका.. अस्थिरोग तज्ज्ञाचा सल्ला "खांद्याच्या स्नायूमध्ये कडकपणा आल्यास फ्रोझन शोल्डरचा धोका अधिक असतो. यात तीव्र वेदना होत असतात. साधारणतः वयाच्या चाळिशीनंतर फ्रोझन शोल्डरचा धोका अधिक असतो. त्यामुळे या काळात अधिक काळजी घेणे गरजेचे असते. मधुमेहाची व्याधी असणाऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. खांद्यामध्ये सतत दुखत असेल तर दुर्लक्ष न करता अस्थिरोग तज्ज्ञांना दाखवून उपचार घ्यावा. मधुमेह, थायरॉईडच्या रुग्णांना धोका अधिक मधुमेह, थायरॉईडच्या रुग्णांमध्ये फ्रोझन शोल्डरचा धोका १० ते २० टक्के असतो. फ्रोझन शोल्डरची समस्या लगेच सुटत नाही. ते बरे होण्यासाठी बराच वेळ लागतो." - डॉ. सुनील मल्लोजवार, अस्थिरोग तज्ज्ञ, जनता कॉलेजजवळ, चंद्रपूर