चंद्रपूर : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा चिंचाळा येथील प्रसिद्ध चित्रकार प्रवीण कावेरी यांची चंद्रपूर हेरिटेज प्रदर्शनी आयोजित करण्यात आली. सोबतच ताडाळी बीटातील विद्यार्थ्यांसाठी ‘इंडिया हेरिटेज चित्र’ या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये विविध शाळांतील ९४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
ही स्पर्धा प्राथमिक व माध्यमिक अशा दोन गटांत घेण्यात आली. या ऐतिहासिक वारसाचित्रप्रदर्शनाचे उद्घाटन लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा माजी अर्थ व नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी नागाळा (सि) सरपंचा रंजना कांबळे, अशोक सिंग ठाकूर, मधुसूदन रुंगठा, नामदेव डाहुले, दुर्योधन वाघमारे, प्रकाश शेंडे यांची उपस्थिती होती.
तीन दिवस चाललेल्या या प्रदर्शनीला प्राथमिक शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे, डाएट प्राचार्य धनंजय चापले, चंद्रपूरचे डीवायएसपी देशमुख, पडोलीचे पीएसआय यादव, सेवानिवृत्त माहिती संचालक शरद चौधरी तसेच अनेक शिक्षकांनी तथा मान्यवरांनी भेट दिली.
चित्रकला स्पर्धेसाठी साईप्रकाश कलाअकादमी भद्रावतीचे शिक्षक शिवरकर, ठमके, प्रवीण निखारे परीक्षक म्हणून काम बघितले.
चंद्रपूरचे संवर्ग विकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना प्रमाणपत्र व शिल्ड देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षण अधिकारी चंद्रपूर समाधान भसारकर, उपसरपंच सज्जन सातपुते, कविता आडे, माया धोटे, कामडी, सुचिता खंदहार, जनार्दन ढोणे, वंदना पानघाटे, नांदे, मेश्राम या शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांची उपस्थिती होती. संचालन प्रवीण ईश्वर डोरलीकर, आभार प्रदीप वासुदेव टिपले यांनी मानले.
बाॅक्स
यांनी पटकाविले बक्षिसे
चित्रकला स्पर्धेत ताडाळी बिटातुन प्राथमिक गट- धनश्री नितीन खंदहार (प्रथम), किंजल चौधरी (दुसरा), नियती चिकटे (तृतीय) चिंचाळा शाळा तसेच माध्यमिक गटातून दीक्षा चंदू ईरावार (प्रथम) बेलसनी शाळा, आर्यन राठोड (दुसरा), पायल गेडेकर , तुकडोजी ग्रामीण विद्यालय, चिंचाळा (तिसरा) या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
ताडाळी बीटाबाहेरील प्राथमिक गटातून क्षिती अजय चुटे प्रथम क्रमांक, माऊंट कॉन्व्हेंट चंद्रपूर, रचना नामदेव आस्वले दुसरा- नारायणा विद्यालय, ग्रीष्मा भैसारे तृतीय नारायणा विद्यालय यांनी बक्षीस पटकाविले तर माध्यमिक गटातून इशिका शेळके हिने प्रथम क्रमांक सेंट्रल स्कूल ओ. एफ. चांदा, साहिल भोयर दुसरा- भवानजीभाई विद्यालय, अनुष्का भावे तृतीय- सेंट एनेस हायस्कूल सुमठाना यांनी यश संपादन केले.