लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : औद्योगिक विकास व सामाजिक सामजस्यातून जी. एम. आर. वर्धा पॉवर कंपनीने सी. एस. आर. फंडातून वरोऱ्यात आर. ओ. वॉटर ए. टी. एम.ची निर्मिती केली. या कार्याचा बोध घेत जिल्ह्यातील औद्योगिक समुहांनी अशाच सामाजिक संवेदनशिलतेचा अंगिकार करावा, त्याचबरोबर लोकहित व विकासाची कास धरून जवाबदारीचे निर्वहन करावे, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहीर यांनी केले.वरोरा येथील बावणे ले - आउट मध्ये जी. एम. आर. कंपनीद्वारा आर. ओ. वॉटर ए. टी. एम. सुरु करण्यात आले. या ए.टी.एमचे उद्घाटन केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहीर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाप्रसंगी मंचावर जी.एम.आर.चे मुख्य कार्यपालक अधिकारी संजय बरडे, वरोराचे नगराध्यक्ष अहतेशाम अली, माजी मंत्री संजय देवतळे, भाजपा नेते विजय राऊत, जिल्हा महामंत्री राहुल सराफ आदी उपस्थित होते.ना. अहीर पुढे म्हणाले, जीएमआर कंपनीने आतापर्यंत ११ आर. ओ. वॉटर प्लॉटची निर्मिती केली आहे. ४०० पेक्षा जास्त वैयक्तिक व एका सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करून शौचालयाची सुविधा उपलब्ध केली आहे. लोकांच्या आरोग्याबाबत दक्ष राहून प्रदूषण संदर्भात काळजी घेत आहे. विशेष म्हणजे डॉ. आंबेडकर जयंतीदिनी लोकार्पण सोहळा पार पडत असल्यामुळे कंपनीतर्फे हेच खरे अभिवादन असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.जी. एम. आर. चे सीईओ संजय बरडे म्हणाले, कंपनीतर्फे येणाºया पावसाळ्यात दीड लाख फळझाडे वरोरा शहरात व परिसरात लावण्याचे लक्षांक ठेवण्यात आले असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी वरोरा शहराचे नगराध्यक्ष अहेतेशाम अली, प्रकल्प प्रमुख धनंजय देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.
औद्योगिक समूहांनी सामाजिक संवेदनशिलता जोपासावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 11:10 PM
औद्योगिक विकास व सामाजिक सामजस्यातून जी. एम. आर. वर्धा पॉवर कंपनीने सी. एस. आर. फंडातून वरोऱ्यात आर. ओ. वॉटर ए. टी. एम.ची निर्मिती केली. या कार्याचा बोध घेत जिल्ह्यातील औद्योगिक समुहांनी अशाच सामाजिक संवेदनशिलतेचा अंगिकार करावा, त्याचबरोबर लोकहित व विकासाची कास धरून जवाबदारीचे निर्वहन करावे, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहीर यांनी केले.
ठळक मुद्देहंसराज अहीर : वरोरा येथे वॉटर एटीएमचे लोकार्पण