तळोधी बा. : नागभीड तालुक्यात मोठ्या प्रमाणात धान पिकावर खोडकिडा व लष्करी अळीचा प्रादुर्भाव असल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. नागभीड तालुक्यात २५,८२३ हेक्टरी क्षेत्रात धानाची लागवड करण्यात आली आहे. मागील वर्षी मावातुडा रोगामुळे शेतकऱ्यांच्या धानाची तणस झाल्याने उत्पादन घटले होते.
आधीच शेतकरी वर्ग अडचणीत असताना पुन्हा या भागातील धान पिकावर खोडकिडा व लष्करी अळी, पाने गुंडाळणारी अळी व गादमाशीचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकरी वर्गाला कृषी विभागाकडून कुठल्याही प्रकारची मदत व मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे शेतकरी आपले धान पीक वाचविण्यासाठी कृषी केंद्रातून महागड्या औषधींची फवारणी करीत आहेत. मात्र, फायदा होत नसल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे.
कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाहीच्या माध्यमातून तळोधी बा. मंडळ क्षेत्रात खोडकिडा, गादमाशी व अळीचा प्रादुर्भाव असल्याने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन धान पिकाची पाहणी करण्यात आली. यावेळी डाॅ. ए. व्ही. कोल्हे, डाॅ. व्ही. जी. नागदेवते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊ बऱ्हाटे यांनी पिकाची पाहणी करून औषधींची फवारणी करण्याची शेतकऱ्यांना माहिती दिली आहे.
- पी. एस. शिंदे, मंडळ कृषी अधिकारी, तळोधी बा.
230821\img_20210823_084702.jpg
शेतात असलेल्या किडाचे भक्षण करताना बगळे