प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : कपाशीवर आलेल्या चुरडा रोगाने राजुरा तालुक्यातलील शेकडो हेक्टर कापसाच्या शेतीला मोठा धोका निर्माण झाल्याने यावर्षी कापसाचे उत्पादन होणार की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना आताच सतावत आहे. महागडे कीटकनाशक औषध फवारणी करूनही पिकांवर आलेला रोगांचा प्रादुर्भाव कमी झाला नाही. त्यामुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, कोरपना, जिवती, वरोरा तालुक्यातील कापसाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. कापूस शेतकऱ्यांचे एकमेव नगदी पिक आहे. परंतू मागील वर्षी बोंडअळीने कापूस आल्यानंतर यावर्षीही कपासीला मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा डंख बसण्याची शक्यता अधिक आहे. यावर्षी कापसाच्या शेतीला मोठा फटका बसण्याची चिन्हे दिसत असून कपासीला विविध रोगाने ग्रासल्याने कपासीच्या झाडांची वाढ पूर्णत: खुंटली आहे. कापसाला यावर्षी पाहिजेत त्या प्रमाणात पोषक वातावरण नसल्याने कापसावर यावर्षी संक्रात येण्याची दाट शक्यता आहे. अतोनात खर्च करूनही उत्पादन झाले नाही तर निराश झालेल्या शेतकऱ्यांनी करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर्षीही कपाशवर बोंडअळी येण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.राजुरा तालुक्यातील गोवरी, सास्ती, रामपूर, माथरा, पोवनी, साखरी, चार्ली, निर्ली, धिडशी, कढोली, मानोली, बाबपूर, वरोडा, चंदनवाही, चिंचाली, मुठरा, गोयेगाव, अंतरगाव, खामोना, अहेरी, पाचगवा, पांढरपौणी, जिल्ह्यातील बहुतांश भागात कपासीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने यावर्षी कापसाच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे उदासीनतेचे भाव बरेचकाही सांगून जाणारे आहे. पिकांवर केलेला खर्चही निघणार कि नाही याची चिंता आता शेतकऱ्यांना चांगलीच सतावत आहे.कापूस माघारणारकापसाच्या पिकांवर यावर्षी मोठ्या प्रमाणात विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पांढऱ्या सोन्याला उत्पादनात मोठी घट होणार असून त्यांच्या मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. पांढऱ्या सोन्याची यावर्षी होणारी घसरण चिंतेचा विषय असून पांढऱ्या सोन्याची माघार यावर्षी शेतकऱ्यांना अस्वस्थ करणारी आहे.
शेकडो हेक्टरमधील कपाशीवर ‘चुरडा’चा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 12:22 AM
कपाशीवर आलेल्या चुरडा रोगाने राजुरा तालुक्यातलील शेकडो हेक्टर कापसाच्या शेतीला मोठा धोका निर्माण झाल्याने यावर्षी कापसाचे उत्पादन होणार की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना आताच सतावत आहे. महागडे कीटकनाशक औषध फवारणी करूनही पिकांवर आलेला रोगांचा प्रादुर्भाव कमी झाला नाही.
ठळक मुद्देशेतकरी आर्थिक संकटात : राजुरा तालुक्यात कापसाचे उत्पादन घटणार