लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गणपतीच्या प्रतिष्ठापणेसाठी भक्तांची लगबग सुरु असताना बाजारपेठेत पुजेचे साहित्य उपलब्ध झाले असून गणेशभक्त मोठ्या आवडीने खरेदी करीत आहेत. ऐरवी कचरा म्हणून फेकण्यात येणाऱ्या दूर्वाला मोठी किंमत आली असून सांभाराच्या जुडीपेक्षा महागड्यात दरात म्हणजेच २० ते ३० रुपये जुडीप्रमाणे तिची विक्री होत आहे. त्यासोबतच गणपतीच्या पुजेच्या साहित्यांच्या किंमतीसुद्धा गगणाला भिडल्या आहेत. गणेश उत्सव जिल्हात मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येतो. घरोघरी गल्लीबोळापासून शहरात मोठ्या प्रमाणात झगमगाट लाईटिंग केली असते. तर घरगुती गणपतीची सजावटही मोठ्या प्रमाणात करण्यात येते. गणपती पुजेचे साहित्याला यावर्षी महागाईची झळ बसत आहे. गणपतीच्या पुजेच्या साहित्यांची किंमतीसुद्धा गणगणाला भिंडल्या आहेत. ग्रामाणी भागात मातीमोल असणाºया दूर्वा, आंब्याची पाणे, धोप्याची पाणे, पत्राळ, द्रोण, नारळ, लाल कापड, कणस यांच्या किंमती गगणाला भिडल्या आहेत. त्यामुळे गणेशभक्ताला आपल्या आराध्य देवातांची पुजा करण्यासाठी महागाईची झळ बसत आहे.फुलांची मागणी वाढलीगणेशोत्सवा फुले आणि हाराला मोठी मागणी असते. ही वाढती मागणी लक्षात घेता सद्या फुले आणि हारांचे दरही वाढल्याचे दिसून येत आहे. यावर्षी पावसामुळे फुलशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे दर वाढले आहेत. सद्या उत्सवामुळे फुले २०० रुपये किलोे, हार ५० रुपयांपासून ३०० रुपयांपर्यत, गुलाबाचे फुल ३० ते ५०, इतर फुलांच्या किंमतीही वाढल्या आहेत.रेडीमेड वस्तूंची मागणी वाढलीबाप्पाचे आवडते पदार्थ मोदक. सध्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात रेडीमेट मोदक उपलब्ध मिळत आहेत. त्यामध्ये मावा केसरी मोदक हा चारशे रुपये किलो, कंदी पेंढयांच्या चवीप्रमाणे लागणारे मोदक चारशे, मलईद्वारे तयार केलेला मोदक ४४० रुपये, मँगो आंब्यांच्या आस्वादाचा मोदक ५०० रुपये किलो, पिवळा रंग वापरुन तयार केलेला मोदक ३६० रुपये किलोविक्रीला आहे. त्यासोबतच बाप्पाचा प्रसादही विक्रीसाठी दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे