श्रावण महिन्यातील अमावस्येला पाळा असतो. या दिवशी बैलांची पूजा करण्याची परंपरा आहे. दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा साजरा केला जातो. पोळ्यासाठी बाजार सजला आहे. यामध्ये विविध रंगातील साहित्य सध्या बाजारात आले आहे. बैलांसाठी कासऱ्यापासून झुलींपर्यंत सर्व साहित्य आहेत. मात्र महागाई वाढल्याने अनेकांनी मागील वर्षीच्या साहित्यावर पोळा साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
तान्हा पोळ्याच्या दिवशी लहान मुलांमध्ये बैलांना सजविण्याची देखील स्पर्धा असते. मात्र कोरोना सावटामुळे यावर्षीही घराघरांतूच पोळा साजरा करावा लागणार आहे.
बाॅक्स
मातीचे बैलही महागले
मातीचे बैल विक्रीसाठीही बाजारात आले आहे. मात्र किमती पाहून अनेकांनी घेण्याचे टाळले आहे. मातीच्या बैलाची एक जोडी ७० ते १०० रुपयांपर्यंत विकली गेली. घरात पूजा करण्यासाठी या बैलजोडीला मागणी असते.
बाॅक्स
आज आवतन घ्या, उद्या जेवायला या
शेतकऱ्यांचा सर्वात आवडता सण पोळा आहे. या दिवसाच्या पूर्वसंध्येला बैलांची खांद शेकणी केली जाते. यावेळी आज आवतन घ्या, उद्या जेवायला या, अशी साद शेतकरी बैलांना घातली. बैलांची तूप व हळदीने खांदशेकणी करण्यात आली. वर्षभर बैलांच्या खांद्यावर ओझे असते. पोळ्याच्या निमित्ताने बैलांच्या खांद्याला तूप आणि हळद लावून शेकल्या जाते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बैलांची खांदशेकणी केली.