लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण तसेच अधूनमधून येणाऱ्या पावसामुळे कापूस, सोयाबीन आदी पिकांवर विविध रोगांचा प्रादूर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. दरम्यान, काही दिवसापूर्वी कृषी विभागाने कोरपना तालुक्यातील शेतशिवारात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळीही त्यांना प्रादूर्भाव होत असल्याचे आढळले.मागीलवर्षी लष्करी अळीने पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान केले होते. ही अळी साधारणत: ८० पिकांवर उपजिविका करु शकते. मादी एका जीवनकाळात हजार ते दीड हजार अंडी घालू शकते व ही कीड एका रात्रीतून १०० किलोमीटरचा प्रवास करु शकते.पहिल्या व दुसºया अवस्थेतील लष्करी अळ्या पाने खुरबडून खातात. त्यामुळे पानावर पांढरे लांबट चट्टे दिसून येतात. अळी तिसऱ्या अवस्थेत पाने खाण्यास सुरुवात करते व पानाला छिद्र करते. सहाव्या अवस्थेत अळी अधिरपणे पाने खावून मोठ्या प्रमाणात विष्ठा टाकते. १० टक्केपेक्षा जास्त नुकसान आढळून अल्यास थायोमेथोक्झाम १२.६ अधिक लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन ९.५ टक्के तीन मिली किंवा पिनोटेरम ११.७ टक्के एसपी ४ मिली किंवा क्लोरॅट्रॅलीप्रोल १८.५ एस.सी. चार मिली प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास या रोगांचा प्रादूर्भाव काहीसा कमी करता येणार आहे.उत्पादनात घट होण्याची शक्यतामागील काही दिवसांपासून दररोज येणाऱ्या सरींमुळे कीटकनाशकावरील फवारणी व्यर्थ ठरत आहे. तणनाशकाच्या फवारणीअभावी पिकात तण वाढून पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. तण काढण्यासाठी मजुरांची कमी, मजुरीचे वाढते दर या सर्व अडचणींनी उत्पादन कमी होणार, ही चिंता शेतकºयाला आहे. मागील काही दिवसांपासून सूर्याचे दर्शन झाले नाही. आणखी किती दिवस हेच वातावरण राहणार, हे अनिश्चित आहे. दररोज ढगाळ वातावरण व रिमझिम पाऊस कोसळत आहे. सूर्यप्रकाशाअभावी सोयाबिनवर चक्रभुंगा अळी,कापसावर चुरडा तर तुरीवर पाने गुंडाळणारी अळी तर भाजीपाल्यावर पाने कुरतडणाऱ्या अळ्यांचा मोठा प्रभाव दिसत आहे. परिणामी, सोयाबिनची चाळण होत आहे. चुरड्यामुळे कापसाच्या झाडांची वाढ थांबली आहे. तर सततच्या रिपरिपमुळे सखल भागातील तुरीची झाडे करपत आहेत. शेंडे गुंडाळणाºया अळीमुळे तुरीचे पीक संकटात आले आहे. रोगाच्या प्रभावाबरोबर पोषक वातावरण असल्याने पिकात तणाची वाढ होत आहे. ढगाळ वातावरण व दररोज येणाºया पावसाच्या सरी फवारणीसाठी अडचणीच्या ठरत आहेत. मजुरांची मोठी चणचण असून मजूर मिळणे कठीण झाले आहे. मिळाले तरी मजुरीचे दर व मजूर आणण्यासाठी करावा लागणारा वाहन खर्च, अतिरिक्त सहन करावा लागत आहे. आधी उशिरा पेरणी, दरम्यान पावसाची दीर्घ विश्रांती आणि आता पावसाची सतत रिपरिप यामुळे पिकांची अपेक्षित वाढ झाली नाही. त्यामुळे शेतीचा खर्च वाढणार असला तरी उत्पादन घटणार, यामुळे शेतकरी चिंतेत आहे.
कापूस, सोयाबीनवर रोगांचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 12:17 AM
मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण तसेच अधूनमधून येणाऱ्या पावसामुळे कापूस, सोयाबीन आदी पिकांवर विविध रोगांचा प्रादूर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. दरम्यान, काही दिवसापूर्वी कृषी विभागाने कोरपना तालुक्यातील शेतशिवारात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळीही त्यांना प्रादूर्भाव होत असल्याचे आढळले.
ठळक मुद्देसूर्यनारायणाचे दर्शन नाहीच : जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली