शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
2
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
3
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
4
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
5
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
6
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
7
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
8
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
9
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
10
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
11
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
12
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
13
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
14
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
15
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
16
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
17
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
19
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
20
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2017 12:36 AM

शाळकरी विद्यार्थ्यांना बँकेत खाते उघडायचे असेल तर त्यासाठी डिपाजीत रक्कम म्हणून आधी ५०० रुपये जमा करा, त्याशिवाय खाते उघडता येणार नाही.

पाटणच्या बँकेतील प्रकार : खाते उघडण्यासाठी ५०० रूपये जमा करण्याची अटजिवती : शाळकरी विद्यार्थ्यांना बँकेत खाते उघडायचे असेल तर त्यासाठी डिपाजीत रक्कम म्हणून आधी ५०० रुपये जमा करा, त्याशिवाय खाते उघडता येणार नाही. या बँक व्यवस्थापकाच्या आदेशाने विद्यार्थी तसेच पालकवर्ग संभ्रमात पडला आहे. हा तर विद्यार्थ्यांना शासनाच्या शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवण्याचा डाव आहे, असे पालकांकडून बोलले जात आहे.पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शासन शिष्यवृत्ती देत असते. यामध्ये वर्ग १ ते १० च्या अनु.जमाती मुलामुलींना सूवर्ण महोत्सवी तर ५ ते १० पर्यंत शिकणाऱ्या अनु.जाती, विमुक्त भटक्या जाती जमाती फक्त विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती तसेच अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी अल्पसंख्यांक नावाची शिष्यवृत्ती मिळत असते. या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेत विद्यार्थ्यांचे खाते आवश्यक आहे. मात्र बँक व्यवस्थापकाच्या आदेशाने खाते उघडण्यासाठी विद्यार्थ्याला डिपाजीट भरणे आवश्यक आहे. जिवती तालुका आधीच मागासलेला असून येथे गरीब कुटूंब वास्तव्यात आहेत. अनेक हालअपेष्टा सहन करून आपल्या मुलांना शिक्षण देत असताना खाते उघडण्यासाठी डिपाझीट रक्कम कुठून भरायची, हा येथील गोरगरीब पालकांना प्रश्न पडला आहे. विद्यार्थ्यांना डिपाझीट भरावी लागत नाही, असे शासनाचे अधिकारी म्हणत असले तरी बँक व्यवस्थापकाची मनमानी सुरू असल्याने विद्यार्थ्यांना खाते उघडण्यास अडचणी येत आहेत. यावरुन शासन नियमाची पायमल्ली होताना याठिकाणी दिसत आहे. जिवती येथे स्टेट बँकेची मागणीसंपूर्ण तालुक्यात केवळ एकच राष्ट्रीयीकृत बँक पाटण येथे आहे. पाटण येथे एकमेव स्टेट बँक असल्याने जनतेचे तसेच इतर अनेक कामे वेळेवर होत नाही. ही समस्या लक्षात घेता, जिवती येथे स्टेट बँकेची शाखा उघडण्यात यावी, अशी अनेक वर्षापासून मागणी आहे. जिवती हे तालुक्याचे ठिकाण असून येथे स्टेट बँक आवश्यक आहे. मात्र या मागणीकडे प्रशासनाचे व शासनाचे नेहमी दुर्लक्ष होताना दिसत आहे. बँकेची समस्या निकाली लागली तर विद्यार्थ्यांना सुद्धा अडचण जाणार नाही.