लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात सध्या हिमोग्लोबीन इंजेक्शनसह औषधांचा तुटवडा आहे. त्यामुळे रूग्णांना खासगी औषधी दुकानात जावे लागत आहे. औषधी मिळत नसल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांना रूग्णांच्या रोषालाही बळी पडावे लागत असल्याचे चित्र आहे.राज्य शासनाने दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषद, जिल्हा रूग्णालयांतील औषध पुरठ्याची जबाबदारी हाफकिन कंपनीकडे सोपविली होती. मात्र या कंपनीने गेल्या दोन वर्षांत मागणीनुसार औषधांचा पुरवठाच केला नाही. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रात नेहमीच औषधांची टंचाई असते. प्रसुत झालेल्या महिलांचे हिमोग्लोबीन कमी असल्याने त्यांना इंजेक्शन देण्याचे निर्देश आहेत. मात्र अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात या इंजेक्शनचा तुटवडा आहे. इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची मागणी कित्येकदा जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाकडे करण्यात आली. मात्र अजूनही इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आले. परिणामी वैद्यकीय अधिकाºयांना रूग्णांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे.थंडी वाढल्याने जिल्ह्यातील काही भागात ताप, सर्दी, खोकल्याचे रूग्ण मोठ्या प्रामणावर दिसून येत आहे. मात्र सर्दी, खोकल्यांच्या औषधसाठा उपलब्ध नाही. त्यामुळे रूग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.जिल्ह्यात ५७ आरोग्य केंद्रजिल्ह्यात ५७ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. जवळपास शंभराच्या आसपास उपकेंद्र आहेत. आरोग्य केंद्रे, उपकेंद्रात ताप, सर्दी खोकल्याचा औषधांचा तुटवडा आहे. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे.
इंजेक्शन, औषधांच्या तुटवड्याने रूग्ण बेजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 10:05 PM
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात सध्या हिमोग्लोबीन इंजेक्शनसह औषधांचा तुटवडा आहे. त्यामुळे रूग्णांना ...
ठळक मुद्देवैद्यकीय अधिकाऱ्यांवर रोष : बाहेरून करावी लागते खरेदी