शिक्षण विभागांतर्गत समाजातील वंचित व दुर्बल पालकांच्या मुलांसाठी नामांकित शाळा - कॉन्व्हेंटमध्ये २५ टक्के आरक्षण असते. मात्र, सधन नागरिक व शासकीय निमशासकीय कर्मचारी आपल्या मुलांसाठी या योजनेचा लाभ घेत असल्यामुळे गरीब गरजू लाभार्थी पालकांच्या मुलांवर अन्याय होत आहे. होणारा अन्याय दूर करण्याबाबतचे निवेदन आमच्या शिष्टमंडळाद्वारे सिंदेवाही पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संजय पालवे यांना दिले आहे.
चालू शैक्षणिक वर्षातील य़ा योजनेंतर्गत पहिल्या प्रवेश यादीतील कर्मचारी पाल्यांचे प्रवेश रद्द करावे, त्याऐवजी दुसऱ्या प्रवेश यादीतील प्रतीक्षा यादीतील गरीब लाभार्थींना प्रवेशाचा मार्ग मोकळा करावा व योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.
- नंदू खोब्रागडे, ब्रम्ह्पुरी विधानसभा अध्यक्ष बहुजन समाज पार्टी.
===Photopath===
280621\img-20210628-wa0043.jpg
===Caption===
बसपातर्फे 25 टक्के मोफत प्रवेश योजना तील वंचित लाभार्थीबाबत निवेदन !