शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

अनियमित समायोजन प्रक्रियेमुळे शिक्षकांवर अन्याय

By admin | Published: July 08, 2016 12:53 AM

पंचायत समिती गोंडपिपरी अंतर्गत शिक्षक समायोजन प्रक्रियेत अनियमितता करण्यात आली.

गोंडपिपरी पंचायत समिती : तक्रार दाखल, कारवाईकडे लक्षचंद्रपूर : पंचायत समिती गोंडपिपरी अंतर्गत शिक्षक समायोजन प्रक्रियेत अनियमितता करण्यात आली. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांवर अन्याय झाला आहे. याबाबत शिक्षण विभागाकडे तक्रार करूनही कारवाई न झाल्यामुळे सर्वकष चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चुनारकर यांनी निवेदन पाठविले आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती देवराव भोंगळे यांच्याशी शनिवारी चर्चा करण्यात आली. यावेळी शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, गटशिक्षणाधिकारी उराडे उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष प्रकाश चुनारकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात विलास बोबडे, संजय माथनकर, मदन बेत्तावार, बाबुराव मत्ते यांचा समावेश होता. गोंडपिपरी पंचायत समितीमध्ये ३० सप्टेंबर २०१५ अन्वये पटसंख्येनुसार शिक्षक संख्या बरोबर असताना सुद्धा शिक्षकांचे अन्य ठिकाणी समायोजन करण्यात आले आहे. शासन आदेश १८ मे २०११ नुसार पदविधर शिक्षकांच्या जागी जर सहाय्यक शिक्षकांना तात्पुरती नियुक्ती दिली असेल तर अशी पदे समायोजनाची संख्या निश्चित करताना वगळावी, असे म्हटले आहे. मात्र असे असताना सुद्धा शिक्षकांना समायोजनात अन्य शाळा देण्यात आल्या. तालुक्यात ३० आॅगस्ट २०१४ पासून तात्पुरत्या नियुक्त्या दिलेल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात ३१ मे २०१६ पुर्वी समायोजन बदली प्रक्रिया होण्याच्या दृष्टीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व पंधराही पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना आदेश देऊन शासन आदेश १८ मे २०११ नुसार समायोजन प्रक्रिया राबविण्याचे म्हटले होते. समायोजनात अनियतता आढळल्यास कडक कारवाईचा इशारा संवर्ग विकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना दिला होता. त्यामुळे पंचायत समिती गोंडपिपरी अंतर्गत झालेल्या समायोजनात अनियमितता झाल्याची तक्रार पंचायत समिती गोंडपिपरी मधील एका शिक्षकाने जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांच्याकडे रितसर दाखल केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन हे प्रकरण कशाप्रकारे हाताळते, याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)