लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यासाठी सर्वसामान्य जनतेला आपल्या कल्पक आयडीया मागितल्या आहेत. ३१ मार्चपर्यंत आपल्या संकल्पना आॅनलाईन, आॅफलाईन प्रशासनाकडे पाठविण्याची विनंती केली आहे. या अभिनव स्पर्धेत देशातील व महाराष्ट्रातील सर्व कल्पक नागरिकांना सहभागी होता येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी दिली.महाराष्ट्राचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात या अभिनव स्पर्धचे आयोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. यापूर्वी सामान्य जनतेच्या प्रशासनातील अडचणी सोडवता याव्यात, यासाठी मोबाईलवरुन प्रशासनाशी संवाद साधणारा ‘हॅलो चांदा’ हा उपक्रम जिल्ह्यात कमालीचा यशस्वी ठरला आहे. खोज अर्थात शोध नाविन्याचा ही स्पर्धा देखील शेती, उपजिविका विकास, पर्यटन व प्रशासन सुधारणा यामध्ये प्रशासनाने काय बदल करावेत, याच्या संकल्पना मागवणारी आहे. सामान्य व्यक्तीकडे अनेक भन्नाट कल्पना असतात. अशा अफलातून कल्पनांमुळे क्षणात मोठे बदल संभवतात. अशा बदलांना प्रशासनात उपयोगात आणण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे.असे होता येणार सहभागीमहाराष्ट्रात प्रथमच एखाद्या जिल्ह्यात असा प्रयोग होत आहे. सर्व नागरिक यामध्ये सहभागी होऊ शकतात. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पोर्टलवर या संदभार्तील लिंक देण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबपोर्टलवरही याबाबतच्या सूचना व लिंक देण्यात आली आहे. डब्लूडब्लूडब्लू.महाराष्ट्र.एमवायजीओव्ही.इन या वेबसाईटवर आॅनलाईन अर्ज करण्याची सुविधा आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील पत्रकार, विचारवंत, डॉक्टर, वकील व सर्व क्षेत्रातील मान्यवरांना यामध्ये सहभागी होता येईल. सर्वोत्कृष्ट कल्पनांकरिता १ लाख २ हजार रुपयांची रोख बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. यासाठी ‘हॅलो चांदा’ या टोल फ्री क्रमांक १८००-२६६-४४०१ वर माहिती उपलब्ध आहे.
चंद्रपूर जिल्हा प्रशासनाची महाराष्ट्रासाठी अभिनव खोज स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 11:06 AM
चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यासाठी सर्वसामान्य जनतेला आपल्या कल्पक आयडीया मागितल्या आहेत.
ठळक मुद्देमुनगंटीवार यांचे मार्गदर्शनजनतेच्या नव्या कल्पनांना वाव